पाचोरा बाजार समितीकडून शेतमाल तारण कर्ज वितरण; २ लाखांचा धनादेश वितरित

हॅलो जनता पाचोरा, ता. २४ जून
अवकाळी पावसामुळे व बाजारातील प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण कर्ज योजना प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे.
या योजनेअंतर्गत आज शेतकरी अनिल विश्वासराव पाटील (रा. पाचोरा) यांना २ लाख रुपयांचा धनादेश बाजार समितीच्या वतीने प्रदान करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती श्री. गणेश भिमराव पाटील, संचालक प्रकाश शिवराम तांबे, विजय कडू पाटील, युसुफ भिकन पटेल, सचिव बी. बी. बोरुडे, उपसचिव प्रतिक रमेश ब्राम्हणे, कर्मचारी वसंत चैत्राम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाच्या एकूण किंमतीवर ७०% पर्यंतचे कर्ज, वार्षिक ६% व्याजदराने, १८० दिवसांसाठी, वखार महामंडळाच्या पावतीवर दिले जात आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपला माल सुरक्षित ठेवता येतो तसेच बाजारातील चांगल्या भावाची वाट पाहता येते.
सभापती गणेश भिमराव पाटील व उपसभापती प्रकाश अमृत पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले असून, ही योजना भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार बाजार समितीने व्यक्त केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…..
निरोप समारंभ ; सर्व कर्मचारी शेतकऱ्यांची एकच भावना “असा अधिकारी होणे नाही”