Avkali paus : राज्यातील सर्वाधिक पीक नुकसान हे जळगाव जिल्ह्यात, जाणून घ्या नुकसानीची आकडेवारी
हॅलो जनता प्रतिनिधी | सलग सहाव्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. विदर्भात गेल्या तीन दिवसांत तब्बल साडेसात हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. सर्वाधिक चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान एकट्या जळगाव जिल्ह्याला झाल्याचा अंदाज आहे. अजूनही अनेक तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात ९ एप्रिलपासून अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले आहे. प्राथमिक अंदाजानुसार राज्यात ७ हजार ४८९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
जागतिक हवामानाच्या बदलत जाणाऱ्या स्थितीचा परिणाम जिल्ह्यातील वातावरणावर देखील होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बेमोसमी पावसाची स्थिती वारंवार निर्माण होत आहे. त्यामुळे गेल्या पाच ते सहा वर्षाच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात यंदा अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे.
यंदा फेब्रुवारी, मार्च व एप्रिल या महिन्यांमध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील २१ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. २०१९ पासून अवकाळी पावसामुळे झालेल्या रब्बी हंगामाच्या नुकसानीच्या स्थितीचा अभ्यास केला. तर २०२४ या वर्षात रब्दी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
अजून काही दिवस पावसाची शक्यता असल्याने, नुकसानीच्या आकडेवारीत अजून वाढ होण्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. तर काही भागांमध्ये अजून पंचनामे झालेले नाहीत. या नुकसानीमुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे.
वाचा इतरही बातम्या
प्रदूषण नियंत्रणासाठी सरसावली मनपा, सव्वा कोटीचे अत्याधुनिक वाहन प्रशासनाच्या ताफ्यात दाखल