हॅलो राजकारण

🔴 पाचोरा ब्रेकिंग : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक संपन्न…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा व भडगाव तालुक्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक तयारीसंदर्भात आज पाचोरा येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीत नगरपालिकांच्या प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांचे पर्याय, पक्षाची संघटनात्मक स्थिती, निवडून येण्याची क्षमता, तसेच गट-गण निहाय रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली. तालुक्यातील प्रमुख नेते, जिल्हा पदाधिकारी आणि मंडळ अध्यक्ष यांच्यात समन्वय राखण्यासाठी उपाययोजना ठरविण्यात आल्या.

बैठकीत ठरविण्यात आले की, गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्ते एकदिलाने आणि पूर्ण ताकदीने मैदानात उतरून पक्षाला दैदिप्यमान यश मिळवून देतील. लवकरच मा. ना. गिरीशभाऊ महाजन, खासदार स्मिताताई वाघ आणि आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे.

या बैठकीस भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, अमोल शिंदे, वैशाली सूर्यवंशी, प्रतापनाना पाटील, संजय वाघ, मधुकर काटे, सुभाष मुंडे पाटील, सोमनाथ पाटील, डॉ. शांतीलाल तेली, गोविंद शेलार, अनिल पाटील, विनोद नेरकर, डी. डी. पाटील सर, संदीप जैन, ॲड. अमोल पाटील आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या…

🔴 ब्रेकिंग : लाचप्रकरणी वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांसह दोन अटकेत

गाळणच्या हितेश पहेलवानचा राष्ट्रीय स्तरावर झेंडा, आता उजबेकिस्तानमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

🚨 ब्रेकिंग : भडगाव शहर स्वच्छतेसाठी महिलांचा पुढाकार — डासमुक्त शहरासाठी प्रशासनाला साकडे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button