Weather Update : जळगाव, धुळेसह या जिल्ह्यात 3 जानेवारीपासून थंडीचा कडाका वाढणार
हॅलो जनता न्युज, जळगाव :
हिमालयात पुन्हा पश्चिमी चक्रवात येत असल्याने तेथे हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह ११ जिल्ह्यांमध्ये ३ ते ७ जानेवारीदरम्यान थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. राज्यात ढगाळ हवामान आणि पावसामुळे काही दिवस थंडी कमी झाली होती. मात्र, आता वातावरण कोरडे झाल्याने पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे.
थंडीचा अधिक प्रभाव असणारे ११ जिल्हे
नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, आणि गोंदिया या ११ जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका अधिक राहणार आहे. आकाश निरभ्र असल्याने तापमानात घट होत असून, थंडी हळूहळू वाढत आहे.
Weather Update : तापमान बदल
सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान १८.१ अंश सेल्सिअस होते. हवामान विभागाने मंगळवारी ते १६ अंशांपर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
SEBI ची धडक कारवाई ; 15,000 वेबसाइट्स आणि आर्थिक इन्फ्लुएन्सर्सवर बंदी
Jalgaon Crime : घरमालकांच्या विश्वासाला तडा: मोलकरणीने २० लाखांची चोरी करून घेतले फ्लॅट व दुचाकी