Headlines

🛑 ब्रेकिंग : पाचोरा नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम : मुख्याधिकारी मंगेश देवरे उतरले रस्त्यावर

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (गजानन गिरी): शहरातील शिवाजी नगर परिसरातील मुख्य नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला गेला होता. त्यामुळे अलीकडील अतिवृष्टीच्या पावसात पाणी नागरिकांच्या घरात शिरले व प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पाचोरा नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करत थेट कारवाईला सुरुवात केली आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासून…

Read Full News

“माझे स्वप्नातले जळगाव” चित्रकला स्पर्धेत कु. राखी मेतकर हिचा प्रथम क्रमांकाने गौरव

जळगाव : येथे आयोजित करण्यात आलेल्या “माझे स्वप्नातले जळगाव” या विषयावरील चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पनाशक्ती आणि कलागुणांचे उत्कृष्ट दर्शन घडविले. विविध आकर्षक चित्रांमधून जळगाव शहराचे स्वप्नवत चित्र विद्यार्थ्यांनी रंगविले होते. या स्पर्धेतील खुल्या गटामध्ये समाजातील विद्यार्थिनी कु. राखी मधुकर मेतकर हिने उत्कृष्ट चित्रकलेच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावत ₹२१००/- रोख पारितोषिक मिळविले….

Read Full News

नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला आमदार मंगेश चव्हाण यांनी सपत्नीक घेतले आदिशक्ती पाटणादेवीचे दर्शन….

हॅलो जनता, (प्रमोद रुले) – शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला कुलदैवत आदिशक्ती पाटणादेवी येथे जावून आमदार मंगेश चव्हाण यांनी सपत्नीक दर्शन घेतले. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरवात होणार असून पाटणादेवीच्या मंदिरात नयनरम्य अशी सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या तयारीचा आढावा आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून घेण्यात आला. नवरात्र उत्सवाच्या काळात सर्व खान्देशवासियांनी संध्याकाळी ६ ते…

Read Full News

रशियात मृत्यू झालेल्या तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह परिवाराला सुपूर्द, जड अंतःकरणाने परिवाराने केले अंत्यसंस्कार

हॅलो जनता प्रतिनिधी – रशिया येथे नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह शासकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर काल मुंबई विमानतळावर पाचोरा व अमळनेर प्रांताधिकाऱ्यांनी ताब्यात घेत रात्री त्यांच्या परिवाराला सुपूर्द केले आहेत. रशिया येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या जिया फिरोज पिंजारी, जिशान अशफाक पिंजारी यांच्यावर अमळनेर येथे तर हर्षल अनंतराव देसले याच्यावर भडगाव तालुक्यातील वाक् या गावी…

Read Full News

मोठी बातमी : जळगाव-पुणे विमानसेवा (Jalgaon Airport) होणार सुरू, २४ आणि २६ मे रोजी ट्रायल

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव ते पुणे या विमानसेवेची अखेर येत्या आठवड्यात ट्रायल फ्लाइट उड्डाण भरणार आहे. विमानसेवा (Jalgaon Airport) पुरवणाऱ्या ‘फ्लाय ९१’ या कंपनीने २४ व २६ मे रोजी या ट्रायल फ्लाइटचे नियोजन केले असून तिकीट विक्री सुरु केली आहे. सात वर्षांपूर्वी जळगावातून – व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात झाली होती. उदघाटनाच्या वेळी जळगावातून पुण्यासाठी विमानसेवा…

Read Full News

What’s App : व्हाटसअ‍ॅप स्टेट्स ने चोरीला गेलेला बैल सापडला, सोशल मीडियाचा शेतकऱ्याला झाला फायदा

हॅलो जनता (पाचोरा) – सोशल मीडियाचा शेतकऱ्याला फायदा झाला असून त्याचा चोरलेला बैल हा व्हाटसअ‍ॅप स्टेट्सच्या माध्यमातून सापडल्याची घटना ही घडली आहे. पाचोरा तालुक्यातील होळ गावातील शेतकर्‍याचा बैल अज्ञात चोराने रात्री चोरून नेल्याची घटना घडली असून हा प्रकार सकाळी शेतात गेल्यावर शेतकऱ्याच्या लक्षात आला. त्या शेतकर्‍याने तात्काळ व्हाट्सअप स्टेट्सवर बैलाचा फोटो ठेवुन बैल चोरीला गेल्याचे…

Read Full News

💥 ब्रेकिंग : रेल्वेने प्रवास करताय मग ही बातमी वाचा, भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही रेल्वेंच्या मार्गात बदल

हॅलो जनता न्यूज, भुसावळ :- उत्तर-मध्य रेल्वेच्या आग्रा विभागांतर्गत मथुरा स्थानकादरम्यान अप व डाऊन रेल्वेमार्गावर तांत्रिक कनेक्शनचे काम तसेच नव्याने उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कनेक्टिव्हिटीसाठी मथुरा स्थानकात नॉन इंटरलॉकिंग कार्य हाती घेण्यात येणार आहे. यासाठी ३१ जुलै ते २ ऑगस्ट २०२५ या कालावधीत काही रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत. चाळीसगावात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज आढळले, पहा…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : जळगावात ठाकरे सेनेला मोठा धक्का, आमदार किशोर पाटील यांची ताकद वाढली..

हॅलो जनता न्यूज, जळगाव, ता. १४ ऑक्टोबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर आज ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून पक्षातील अनेक निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील,…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट, पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे रिंगणात अन्..

हॅलो जनता न्यूज, पुणे – संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पुण्यातील खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात एक नवे वळण आले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले प्रांजल खेवलकर हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आहेत. आता या प्रकरणात रोहिणी खडसे स्वतःच वकिलाच्या भूमिकेत उतरल्या असून,…

Read Full News

🚨 ब्रेकिंग: नदीत वाहून गेलेल्या भावाचा मृतदेह तब्बल २० दिवसांनी सापडला, तिरडीवरच शेवटची भाऊबीज

हॅलो जनता न्यूज, जळगाव – नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी देवी विसर्जनासाठी नदीत उतरलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल २० दिवसांनंतर सापडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयुरेश्वर कॉलनीतील हेमंत संतोष पाटील (वय १८) हा तरुण देवी विसर्जनासाठी गिरणा नदीपात्रात उतरला होता. विसर्जनानंतर परत येताना त्याचा पाय घसरल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पोलिस, ग्रामस्थ आणि…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION