सावधान ! मेडिकल चालकाला सहा लाखांचा गंडा, Jalgaon Cyber police ठाण्यात गुन्हा दाखल..
हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगाव सैन्य दलात औषध साठ्याची आवश्यकता असल्याचे सांगून एका अनोळखी व्यक्तीने सुनील भिवसन चौधरी (वय ५५, रा.सुदर्शन भवन, चाळीसगाव) यांना ६ लाख ७ हजार ७०० रुपयात ऑनलाइन गंडविल्याचा (cyber crime) प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनिवारी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीनुसार, सुनील चौधरी यांना २३ नोव्हेंबर रोजी एका अनोळखी…
