Headlines

संतप्त जमावाची जामनेर पोलीस स्थानकावर दगडफेक, दगडफेकीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

हॅलो जनता, जामनेर – सहा वर्षाची चिमुकली घरात एकटी असल्याचे पाहून तसेच तुला खाऊ घेऊन देतो, असे आमिष दाखवत गावा शेजारीच असलेल्या शेतात नेत तिचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिचखेडे बुद्रुक गावाजवळ दि. ११ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. घटना घडल्यापासून संशयित आरोपी सुभाष उमाजी भील (वय…

Read Full News

Khan sir : बिहारचे प्रसिद्ध शिक्षक खान सर यांची तब्येत अचानक बिघडली, जाणून घ्या नेमके काय घडले…

हॅलो जनता न्युज बिहारचे लोकप्रिय शिक्षक आणि यूट्यूबर खान सर (Khan sir) सध्या आजारी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खान सर बिहार मधील बीपीएससी परीक्षेतील नॉर्मलाइझेशनच्या विरोधात झालेल्या निदर्शनात सहभागी झाले होते. यानंतर त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना डिहाइड्रेशन, ताप आणि खोकला झाला होता. त्यांना प्रभात मेमोरियल हॉस्पिटलमध्ये…

Read Full News
अवैध वाळू वाहतूक

अवैध वाळू वाहतूक : डंपरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू; चालक पोलिसांच्या ताब्यात

जामनेर प्रतिनिधी दि . ६ – जामनेर तालुक्यातील नेरी येथे बुधवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात गजानन अरुण पाटील (वय ३०, रा. नेरी दिगर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव डंपरखाली चिरडल्याने हा अपघात घडला असून यामुळे परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डंपर (क्रमांक KA 28 KK 9185) चालक आकाश भरत राजपूत…

Read Full News

Rakshatai Khadse : राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचा क्लस्टर विकास कार्यक्रम; जळगाव पायलट प्रकल्पासाठी निवडले – केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे

हॅलो जनता, जळगाव : Rakshatai Khadse  भारताच्या फलोत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने (NHB) क्लस्टर विकास कार्यक्रम (CDP) अंतर्गत ५३ फलोत्पादन क्लस्टर विकसित करण्याची योजना आहे. उत्पादन क्षमता वाढवणे, पश्चात-हानी व्यवस्थापन सुधारणे, आणि मूल्यवर्धनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या ५३ क्लस्टरपैकी जळगाव पायलट प्रकल्पासाठी निवडले गेले आहे. जळगावची…

Read Full News

Mangesh chavhan : आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा प्रचाराचा झंझावात; प्रत्येक घरी उस्फुर्त स्वागत

हॅलो जनता, चाळीसगाव प्रतिनिधी: चाळीसगावसह राज्यभरात निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रचाराला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना उमेदवारांची देखील दमछाक होतांना दिसत आहे. पण चाळीसगाव मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण (Mangesh Chavhan) यांनी मात्र प्रचारात आघाडी घेतली असून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे. आणि विशेष म्हणजे नागरिकांकडून देखील आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे…

Read Full News

विद्यमान आमदारांनी मतदारसंघ भकास करण्याचे पाप केले आहे, सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांची टीका…

हॅलो जनता, प्रतिनिधी – केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांची मोठी उपेक्षा केली असून त्यांच्या प्रश्नांवर विचार करण्यासाठी कुणालाही वेळ नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. सरकार फक्त प्रचारात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. अशी टीका शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केली आहे. पाचोरा भडगाव मतदारसंघातील जारगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या….

Read Full News

Pachora : पाचोरा महाविद्यालयाच्या ‘विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरा’चे खडकदेवळा खुर्द येथे उत्साहात समारोप

हॅलो जनता न्युज, पाचोरा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व पाचोरा (Pachora) तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ‘विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरा’चे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकदेवळा खु.||, ता. पाचोरा येथे दि. 24 ते 30 डिसेंबर 2024 दरम्यान आयोजन करण्यात आले…

Read Full News
Sanjay Raut

Mahavikas Aaghadi : महाविकास आघाडीत वादाची ठिणगी ! संजय राऊतांचा काँग्रेसवर जोरदार हल्ला

हॅलो जनता न्युज, मुंबई : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकीतील पराभवावर चर्चा करताच महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) वादाची ठिणगी पडली. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत पराभवाचे कारण एकमेकांवर ढकलले. या वादामुळे सत्ताधाऱ्यांना आनंद मिळाल्याचे सांगितले जात आहे. कालपासून महाविकास आघाडीतल्या अडचणी आणि वादावर चर्चा होऊ लागली आहे. आज संजय राऊत यांनी…

Read Full News
बांधकाम व्यावसायिक

Bogus companies : महाराष्ट्र बोगस कंपन्यांमध्ये आघाडीवर तर दिल्ली दुसऱ्या स्थानावर

हॅलो जनता, नवी दिल्ली : Bogus companies गेल्या पाच वर्षांत, रजिस्ट्रार ऑफ कंपनीजने (आरओसी) तब्बल २.३३ लाख बनावट कंपन्या बंद केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ३६,८५६ कंपन्या समाविष्ट असून, महाराष्ट्र या प्रकारात देशात आघाडीवर आहे. दिल्ली ३५,६३७ बोगस कंपन्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. गत पाच वर्षांत तब्बल २.३३,५६६ कंपन्यांना यादीतून वगळण्यात आले आहे. याची सुरुवात २०१९-२० मध्ये…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पाचोरा शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत, पाच जणांना चावा तीन गंभीर…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – शहरात भटक्या कुत्र्यांचा अक्षरशः कहर सुरू असून एका दिवसात पाच ते सहा नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या घटनेत एका लहान मुलाचाही समावेश असून कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक हल्ला केल्याने…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION