MVA Jalgaon : शरद पवारांच्या स्वागतावरून नाराजी नाट्य, पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना डावलून दुसऱ्यांना संधी..
हॅलो जनता (जळगाव) – (MVA Jalgaon) आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा आणि मुक्ताईनगर या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता त्यांचं जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. मात्र त्या अगोदरच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे
MVA Jalgaon : पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
विमानतळावर शरद पवारांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी नियमानुसार पाच पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना स्वागतासाठी पाठवले जाते मात्र राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकाऱ्यांना डावलून दुसऱ्या पदाधिकाऱ्यांना विमानतळावर शरद पवारांचे स्वागत साठी पाठवण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हे वारंवार घडत असल्याने पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत प्रत्येक वेळी जेव्हा पक्षाचे जेष्ठ नेते जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतात त्यावेळी असे प्रकारे घडत असतात. त्यामुळे जळगावच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत याची तक्रार वरिष्ठांकडे करणार असल्याचे सांगितले आहे.
Eknath Khadse : एकनाथ खडसे रक्षा खडसेंच्या प्रचारात सक्रिय, वरिष्ठांकडून प्रवेशाची तारीख निश्चित
Jalgaon Accident: महामार्गावर अपघात, भाजप पदाधिकाऱ्याने वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण