⁠हॅलो संवाद

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांना होणार अटक, काय आहे नेमके प्रकरण…

हॅलो जनता, पुणे – नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी पुणे न्यायालयानं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी मनोज जरांगे- पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासह अन्य दोघांविरोधात पुण्यातील कोथरुड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहिल्यानं मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. 2013 मध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाट्य प्रयोगाचं आयोजन केलं होतं. त्या नाट्य प्रयोगाची ठरलेली रक्कम न दिल्याचा आरोप नाट्यनिर्मात्यानं केला होता.

Manoj Jarange Patil : नेमकं काय आहे प्रकरण

2013 मध्ये पुण्यातील कोथरूड परिसरात जरांगे पाटील यांनी नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे दिले नाहीत, असा आरोप पीडित व्यक्तीनं केला. या प्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याची तक्रार कोथरूड पोलिसात 2013 मध्ये दाखल करण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर जरांगे यांच्या पुणे सत्र न्यायालयामध्ये खटला चालू होता. या दरम्यान झालेल्या सुनावणीला मनोज जरांगे पाटील हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावला होता.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप केलेला आहे. या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला जरांगे हजर राहिले नसल्यामुळे त्यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. त्यामुळेच पुन्हा राज्यातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील हे सध्या अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. आता ते न्यायालयाच्या आदेशाला ते काय उत्तर देणार, याकडे राज्याचे लक्ष आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon : आषाढी एकादशीनिमित्त शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून शासकीय रुग्णालय फळे वाटप

Pandharpur : बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे… मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button