⁠हॅलो क्राईम

Exclusive : पाचोरा बस अपघात प्रकरण.. आम्हाला खिडकीतून बाहेर काढले…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : आगारातून निघालेली पाचोरा ते वडगाव कडे या बसला एका भरधाव ट्रॅक्टरने कट मारल्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याच्या कडेला घसरून उलटल्याची भीषण दुर्घटना घडली. या बसमध्ये विद्यार्थी आणि कामानिमित्त जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने होते. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत. सोमवार २२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ही घटना घडली. दरम्यान या बसमध्ये ५० प्रवासी असल्याचे समजते

पाचोरा आगारातून बस क्रमांक एम.एच. १४ बी.टी. २६११ ही बस प्रवाशी व विद्यार्थी घेवुन पाचोरा ते वडगाव कडेच्या दिशेने जात होती. मोंढाळे ते निंभोरी गावा दरम्यान निंभोरी गावच्या माजी सरपंच मीनाक्षी विनायक दिवटे यांच्या गट क्रमांक २७ नजीक शेताजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने बसला कट मारला. यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात घसरून उलटली.

पाचोरा बस अपघात व्हिडिओ _____👇

https://www.facebook.com/share/r/1c1XmxVRJ4/

पाचोरा बस अपघात : डोळ्यासमोर मला माझा मृत्यू दिसू लागला होता

निंभोरी फाट्याजवळ अचानक बस हळूहळू डाव्या बाजूला झुकू लागली. प्रथमतः काय झाले ते मला कळालेच नाही, व बस कलंडली. मी डायबिटीस व दम्याचा आजार असल्याने माझा अचानक जीव घाबरू लागला. मला माझ्या डोळ्यासमोर माझा मृत्यू दिसत होता. मी मोठ्याने रडू लागले. पण याचवेळी परिसरातील नागरिक धाऊन आले व एसटीच्या उजव्या काचा फोडून आम बाजूच्या काच हळूहळू बाहेर काढले.

पाचोरा बस अपघात : आम्हाला खिडकीतून काढले बाहेर

अपघात होताच परिसरातील शेतकरी व नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि बसच्या खिडक्या फोडून प्रवाशांना बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात अनर्थ टळला. बस चालकास हाताला इजा झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

ट्रॅक्टरने कट मारल्याने बस रस्त्यातच कलंडली..

अखिल भारतीय साहित्य संमेलनात कवी राम जाधव यांच्या कवितेची निवड..

🚨 पाचोरा ब्रेकिंग : ७५ प्रवासी घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस उलटली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button