Jalgaon Shetkari : जळगावातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, एकीकडे पाण्याचा अभाव तर दुसरीकडे चोरट्यांचा धुमाकूळ
हॅलो शेतकरी (पारोळा) – यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने शेतकरी हा मोठ्या प्रमाणात अडचणीत असताना आता दुसरीकडे देखील शेतकऱ्यांवर संकट उभा राहिला आहे उभे राहिले आहे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शेतशिवारांमध्ये चोरट्यांनी शेती चे साहित्य चोरून हैदोस मांडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतीचे महागडे साहित्य चोरट्यांनी लंबवल्याचे प्रकार सुरू असून आज पुन्हा लाखो रुपये किमतीचे शेततळ्यातील कागद चोरट्यांनी लंबविल्याचा प्रकार समोर आला आहे.
आज दोन शेतकऱ्याच्या शेतातील लाखो रुपये किमतीचा शेततळ्यातील कागद चोरीला गेल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरातील वस्तू, दागिने विकून या शेतकऱ्यांनी हा लाखो रुपयांचा कागद विकत आणला होता लवकरच खरीप हंगाम सुरू होणार असून शेततळे भरणे आवश्यक आहे त्यासाठी शेतकऱ्यांकडून ही तयारी सुरू होती. मात्र चोरट्यांनी शेततळ्याचा कागद लांबवल्याने शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झाला असून खरीप हंगाम हा धोक्यात आला आहे.
Jalgaon Shetkari : शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ…
त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होण्याची शक्यता आहे गेल्या अनेक दिवसांपासून पारोळा शेतशिवारात हे प्रकार सुरू आहेत वारंवार शेतकऱ्यांकडून पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या जात आहेत. मात्र ठोस कारवाई न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान होत नाही असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली करावी अन्यथा आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Loksabha Election : निवडणूक कामात दांडी; ३० कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल