Jalgaon Politics : मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकरी, कष्टकरी यांच्याशी निष्ठा ठेवली का? उन्मेष पाटील यांचा सवाल
हॅलो जनता (जळगाव) – माजी खासदार उन्मेष पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत दूध संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याय आणि दुधाचे उत्पन्न वाढवण्यासाठी होणारा काळ्या बाजाराचा संदर्भात आरोप केले आहेत. मंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या जवळचे आहेत. (Jalgaon Politics) मात्र जेव्हा पासून मंत्री झाले आहेत तेव्हा पासून खान्देश वासियांवर अन्याय होत असल्याचे सांगत त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे.
Jalgaon Politics : १० वर्षात जिल्ह्याला काय मिळाले
माझ्या निष्ठेवर बोलण्यापेक्षा त्यांनी शेतकरी, कष्टकरी जनतेशी निष्ठा बाळगली आहे का? असा प्रश्न माजी खासदार उन्मेष पाटील उपस्थित केला. कॅबिनेट मध्ये तुम्ही करतात काय? १० वर्षापासून मंत्री असून देखील जिल्ह्यासाठी काहीही योगदान देवू शकले नाहीत. एक चांगला उद्योग, प्रकल्प या ठिकाणी आणु शकले नाहीत अशी टीका उन्मेष पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
VBA Jalgaon : ‘या’ कारणामुळे निवडणुकीपूर्वी जळगावतुन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने घेतली माघार