⁠हॅलो क्राईम

Jalgaon police : अवघ्या तीन तासात मिळाली हरवलेली बॅग परत, पोलिसांनी असा घेतला शोध…

हॅलो जनता (जळगाव) – शहरातील इंद्रनील सोसायटी परिसरात राहणारे कुटुंबीय गावाला जात होते. रेल्वेने जाण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानक येथे आले असता तिकीट खिडकी वर तिकीट घेतांना दागिने आणि मौल्यवान ऐवज असलेली बॅग बाहेरच राहिली. काही वेळातच प्रकार लक्षात आला मात्र तोवर बॅग जागेवर नव्हती. रेल्वे पोलिसात तक्रार नोंदविल्यावर याबाबत शहर पोलिसांना कळविण्यात आले.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भावरी यांनी तात्काळ जळगांव पोलिसांच्या (सी.सी.टी. व्ही विभाग) नेत्रम कक्षाच्या माध्यमातून शहरातील फुटेज तपासले असता एक वयस्क महिला बॅग घेऊन जातांना दिसली पुढील फुटेज पाहिले असता सदर महिला 3 रिक्षा बदलून मोहाडी गावात उतरली असल्याचे रिक्षाचालक यांनी सांगितले असे नेत्रम चे कर्मचारी मुबारक देशमुख यांनी निरीक्षक भवारी यांना कळविले त्या आधारे अवघ्या 3 तासात मोहाडी गावातून बॅग शोधून काढली.

Jalgaon police : शहर पोलिसांनी नेत्रमच्या मदतीने लावला छडा

पोलीस अधिक्षकांच्या हस्ते परत केले दागिने
शहर पोलिसांनी मोहाडी गावात जाऊन चौकशी केल्यावर वृद्ध महिलेचे घर गाठले आणि बॅग ताब्यात घेतली. बॅगेतील सर्व ऐवज सुरक्षीत असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी बॅग पोलीस ठाण्यात आणली. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते बॅग आणि दागिने बडगुजर कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले. शहर पोलीस आणि नेत्रम कक्षाच्या माध्यमातून अवघ्या काही तासात बडगुजर कुटुंबाला आपला ऐवज परत मिळाल्याने त्यांना आनंद झाला होता. पोलिसांचे त्यांनी आभार मानले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Loksabha Elections : महिला व बालकल्याण विभागाच्या प्रयत्नाने दुर्लक्षित महिलांने केले मतदान

Big Breaking : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश यांनी दिला पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button