हॅलो राजकारण

Loksabha Elections : महिला व बालकल्याण विभागाच्या प्रयत्नाने दुर्लक्षित महिलांने केले मतदान

हॅलो जनता (जळगाव) भारतीय लोकशाहीतला सर्वात मोठा उत्सव ही निवडणूक (Loksabha Elections) आहे. या निवडणुकीसाठी अठरा वर्षाच्या वरील प्रत्येक नागरिकांना त्यांच्या मताचा अधिकार आहे. समाजातील दुर्लक्षित घटक जसे सेक्सवर्कर, तृतीय पंथी यांच्या मतासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार निवडणूक प्रशासनाकडून मोठे प्रयत्न झाले. जळगाव जिल्ह्यातील सर्व सेक्सवर्कर यांना त्यांच्या मताचे महत्व पटवून देण्याचे काम महिला व बालकल्याण विभागाने आधार बहुद्देशीय संस्था अमळनेर आणि विप्रो इंटरप्रायझेस यांच्या समन्वयाने केले. आणि सेक्सवर्करनी 100 टक्के आपल्या मताचा हक्क बजावला अशी माहिती जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी वनिता सोनगत यांनी दिली.

सखी वनस्टॉप सेंटरमध्ये असलेल्या महिलांनाही बजावला मताचा हक्क

सखी वन स्टॉप सेंटर मध्ये समुपदेशनसाठी येणाऱ्या 16 महीला यांनी मतदान केले आहे. तसेच कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत समुपदेशन सेंटर मध्ये आलेल्या पीडित 24 महिलांचे मतदान झाले. सहा महिला बाहेरगावी व काहीचे मतदान गुजरात मध्ये असल्यामुळे होऊ शकले नाही नाही. या सर्व महिलांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेवरून मतदानासाठी जागृत करण्यात आले. अशी माहितीही सोनगत यांनी दिली.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Big Breaking : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश यांनी दिला पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा

Old pension scheme: जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्न करणार, श्रीराम पाटील यांचा कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button