⁠हॅलो संवाद

Jalgaon : भडगाव तालुक्यातील जवानाला बचाव कार्य करत असताना आले वीरमरण, परिसरात शोककळा

हॅलो जनता (जळगाव) – अहमदनगर येथील धरणात बुडालेल्यांचा दोघांचा शोध घेण्यासाठी राज्य आपत्ती निवारण दल अर्थात एसडीआरएफचे पथक एका बोटीतून नदीपात्रात शोध घेत होते. शोध सुरू असतांनाच अचानक जवानांची बोट उलटली. यात तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे बेपत्ता झाले आहेत. यात भडगाव तालुक्याचे सुपुत्र वैभव वाघ यांना वीरमरण प्राप्त झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवरा नदी पात्रात दोन जणांचा बुडून मृत्यू झाला असून त्यांना शोधण्यासाठी पाण्यात गेलेल्या एसडीआरएफच्या पथकाची बोट पाण्यात उलटून झालेल्या अपघातात बुडून तीन जवांनाचा मृत्यू झाला असून यात पांढरद येथील जवान वैभव वाघ यांचा देखील समावेश असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Jalgaon : लहापणापासूनच पोलीस दलात जावून समाजसेवा करण्याची वैभवची होती इच्छा…

यातील भडगाव तालुक्यातील पांढरद येथील वैभव वाघ हे धुळे पोलिस दलात शिपाई म्हणून कार्यरत होते. आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे बोट दुर्घटनेत तीन जवानाचे दु:ख निधन झाले, त्यात वैभव वाघ यांचेही निधन झाले. वैभव वाघ यांचे बालपण हे पिचर्डे गावी आजोबा यांच्याकडे गेले असून अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून अभ्यास करत ते शिकले. घरची परिस्थिती गरिबीची होती त्यातून यश मिळवत पुढे त्यांनी पुढील शिक्षण हे भडगाव येथे घेतले. अवघ्या बारा दिवसांचा असतांनाच वडीलाचे छत्र हरपले त्यांनतर पुढील शिक्षण हे भडगाव येथे झाले. पोलीस दलात जाण्याची इच्छा असल्याने २०१४ मध्ये ते गोरेगाव मुंबई येथील भरती झाले त्यानंतर ते धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलात रुजु झाले होते.

दरम्यान, आठ वर्षा पुर्वी लग्न झाले होते भडगाव तालुक्यातील मोठा मित्र परिवार वैभव यांचा होता. आज त्यांच्या वीर मरणाची बातमी येताच परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगी,एक मुलगा असा परिवार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon : जिल्ह्यात बियाण्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून लिंकिंग द्वारे विक्री, ‘ या’ आमदाराने केली तक्रार…

Kharip Hangam : जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीला सुरवात, शेती मशागतीच्या कामांना वेग

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button