Jalgaon Chori : निमखेडी शिवारातील दोन घरांवर चोरट्यांचा डल्ला !
हॅलो जनता, जळगाव : Jalgaon Chori
पत्नीची प्रसूती झाल्याने रुग्णालयात गेलेल्या अमोल कृष्णा पाटील (वय २५) यांच्या घरातून चोरट्यांनी ७० हजार रुपयांची रोकड व तीन तोळे सोने चोरून नेले. याशिवाय, शिरपूर येथे लग्नासाठी गेलेल्या प्रताप काशिनाथ पाटील यांच्या घरातही चोरट्यांनी डल्ला मारला. या घटना शनिवारी (२१ डिसेंबर) सकाळी उघडकीस आल्या, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी अमळनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील जानवे येथील अमोल पाटील हे प्रबोधन नगरात आपल्या आई व पत्नीसमवेत राहतात. ते एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी (२० डिसेंबर) त्यांच्या पत्नीची प्रसूती झाल्याने ते आणि त्यांची आई खासगी रुग्णालयात रात्रभर थांबले होते. शनिवारी सकाळी ते अंघोळीसाठी घरी आले असता, लोखंडी व लाकडी दरवाजे तुटलेले आणि घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
चोरट्यांनी लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून तीन तोळे सोन्याचे दागिने व ७० हजार रुपये लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू केला.
याच परिसरात असलेल्या वैष्णवी पार्कमध्ये राहणारे प्रताप काशिनाथ पाटील हे कुटुंबीयांसह शिरपूर येथे लग्नासाठी गेले असताना त्यांच्या घरातही चोरी झाली. तेथून नेमका किती मुद्देमाल गेला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. दोन घरे फोडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
Swadhar Yojana : स्वाधार योजनेसाठी अर्जाची अंतिम संधी – ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ!
Dainik Deshdoot : “दैनिक ‘देशदूत’चे संस्थापक देवकिसन सारडा यांचे ९२व्या वर्षी निधन”