⁠हॅलो शेतकरी

Jalgaon : जिल्ह्यात बियाण्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून लिंकिंग द्वारे विक्री, ‘ या’ आमदाराने केली तक्रार…

हॅलो शेतकरी (जळगाव) – एकीकडे जिल्ह्यात त मुबलक बियाणे आणि खतांचा साठा असल्याचा कृषी विभागाकडून सांगितले जात असले तरी दुसरीकडे जिल्ह्यात बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. त्यामुळे कृषी केंद्र चालक मनमानी करत लिंकिंग पद्धतीने शेतकऱ्यांना बियाण्यांची विक्री करीत असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असल्याची तक्रार चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

तसेच जिल्ह्यात सर्रास पद्धतीने जादा दराने बियाण्यांची विक्री केली जात असून या विक्रेत्यांवर अद्याप कोणत्याही प्रकारची करवाई झालेली नाही. तरी देखील या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी आमदार लता सोनवणे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे बियाणे मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. तर काही कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे बियाणे लिंकिंग पद्धतीने विक्री करीत आहेत. इतर कंपन्यांचे बियाणे पाकीट घेण्याबाबत शेतकऱ्यांना बंधनकारक केले जात आहे. ते न घेणाऱ्या शेतकऱ्यांना जादा दराने बियाण्यांच्या पाकिटांची विक्री केली जात आहे.

Jalgaon: By creating artificial scarcity of seeds in the district and selling them through linking, ‘Ya’ MLA complained

Jalgaon : जिल्ह्यात बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या बोगस बियाण्यांच्या सुळसुळाट, कारवाई कधी….

चोपडा मतदार संघ हा मध्यप्रदेशच्या सीमेवर असल्याने या भागात बोगस बियाण्यांची तसेच लिंकिंग पद्धतीने बियाण्याची विक्री होत असून गुजरात आणि मध्यप्रदेश मधून कापूस पिकाच्या बियाण्याची सर्रास विक्री होत आहे. त्यामुळे कृषी विभागाने दक्षता घेत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार लता सोनवणे यांनी केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Kharip Hangam : जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीला सुरवात, शेती मशागतीच्या कामांना वेग

Crime News : बापरे! जळगावात पुन्हा तरुणाचा खून, एका संशयितास अटक..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button