Falbag : फळबागा जगविण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, माजी मंत्री राजेश टोपे यांची मागणी….
हॅलो शेतकरी – जालना येथे जिल्ह्यात दुष्काळ व पाण्याअभावी फळबागा (Falbag) जळून जात असल्याने शेतकरी फळबागा तोडून टाकत असल्याने प्रत्यक्ष घनसावंगी तालुक्यातील बहीरगड, राजेगाव व मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केलेली असुन फळबागा जगविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. दुष्काळात मोसंबीच्या फळबाग वाचवण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान असून भर उन्हाळ्यात फळबाग वाचवणे कठीण झाले आहे.
आतापर्यंत हजारो हेक्टरवरील फळबागा जळाल्या आहेत.दुष्काळात विहीर, शेततळ्यातील व बोअर मधील पाणी आटल्याने शेतकऱ्यांच्या फळबागा बागा जळून जात आहेत.शेतकऱ्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या मोसंबीच्या बागा डोळ्यादेखत पाण्या अभावी जळत असल्याने शेतकरी हतबल झाला असल्याने यापूर्वी सन २०१२ मध्ये अशीच परिस्थीती निर्माण झाली होती.
त्यावेळी शासनाने फळबाग (Falbag) वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले होते, त्याचप्रमाणे या वर्षी फळबाग वाचविण्यासाठी शासनाने तात्काळ पंचनामे करून हेक्टरी १ लक्ष रुपये अनुदान देणे गरजेचे आहे. तसेच जून महिन्यामध्ये पाऊस पडल्यानंतर रोजगार हमी योजनेअंतर्गत नव्याने फळबाग लागवडीसाठी रोप उपलब्ध करुन देणे व जिल्ह्यातील पाणी टंचाई व दुष्काळी उपाययोजना करणेबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
जालना जिल्ह्यामध्ये मागील वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने शेती व शेतपिकांचे संपूर्णपणे नुकसान झालेले असून संपूर्ण जिल्हयामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे.जिल्ह्यातील पाण्याचे संपूर्ण स्त्रोत आटल्यामुळे जनावरांना व जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे, पशुधन जागवण्यासाठी चारा उपलब्ध नसल्याने शेतकरी कवडीमोल किमतीत आपले पशुधन विकत आहे.शेतकऱ्याचे पशुधन जगविण्यासाठी तातडीने शासनाच्यावतीने चारा छावण्या सुरु करण्यात याव्यात.दाहक दुष्काळाची भयावह परिस्थिती लक्षात घेता शासनाने तातडीने जिल्हयामध्ये तिव्र पाणी टंचाई असून मोठ्या प्रमाणावर टँकरने पाणी पुरवठा करण्याचे काम सुरु आहे. परंतु त्यामध्ये काही वेळा डिझेल अभावी तर कधी वीज खंडीत होत असल्याने टँकर उभे राहतात.त्यामुळे सुध्दा कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होत आहे. याबाबतही आपण योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.
Dharangaon : धरणगाव शहरात पाणी टंचाई, ठाकरेंच्या सेनेचे नगरपालिका प्रशासनसमोर ठिय्या आंदोलन
Mount Everest : या ठरल्या माऊंट एवरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी