Chalisgaon Accident : चाळीसगावमध्ये ट्रकच्या धडकेत ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
हॅलो जनता न्युज, चाळीसगाव :
चाळीसगाव (Chalisgaon Accident) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी ट्रकचालकाने धडक दिल्याने ६२ वर्षीय वृद्ध ज्ञानेश्वर ईश्वर सूळ यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चाळीसगाव (Chalisgaon Accident) तालुक्यातील तळेगाव येथील ज्ञानेश्वर सूळ हे शनिवारी बाजारासाठी चाळीसगाव येथे आले होते. ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सर्कलजवळ पोहोचले असता, त्यांना ट्रकने धडक दिली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेमुळे घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला आणि काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. तत्काळ वाहतूक शाखेचे पोलीस व शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मयत ज्ञानेश्वर सूळ यांना शासकीय रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये हलवले गेले, आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Chalisgaon Accident : सिग्नल बसवण्यासह ब्रेकर टाकण्याची मागणी
याप्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिग्नल बसवण्यासह ब्रेकर टाकण्याची नागरिकांची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. विशेषतः, गेल्या दोन महिन्यांत याच ठिकाणी हा दुसरा अपघात झाल्याने या मागणीला महत्त्व मिळाले आहे.
जिल्हा क्रीडा स्पर्धेत आयटीआय जळगाव अव्वल स्थानी
Rabbi Hangam : यंदा रब्बीचा पेरा ७१ हजार हेक्टरने वाढला
Gold Silver Price Today : सोने आणि चांदीत झोका ! सोने 80,000 च्या टप्प्याला पोहोचले