Birth- Death Certificate : सर्व्हर डाऊन मुळे जन्म मृत्यूच्या दाखल्यांसाठी नातेवाईकांच्या हेलपाट्या
हॅलो जनता, प्रतिनिधी – महापालिकेच्या तिसर्या मजल्यावरील जन्म-मृत्यू ( Birth- Death Certificate) विभागात दाखले काढण्यासाठी रांगा लागत असल्याचे चित्र असून त्यातच अपुरे मनुष्यबळ आणि शासनाने बदल केल्या नवीन पोर्टलमधील त्रुटींचा फटका नागरिकांना बसत आहे. त्यातच सर्व्हर डाऊनच्या फटक्यामुळे मृत्यूचे दाखल्यासाठी उशिर होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून नागरिक देखील वेठीस धरले जात आहे.
जन्म- मृत्यू दाखले (Birth- Death Certificate) वितरीत करण्यासाठी शासनाकडून सीआरएस पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलमध्ये शासनाकडून जून महिन्यात काही बदल करण्यात आले असून आता शासनाकडून डीसीसीआरएस नावाचे पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे सर्व महानगरपालिका व नगरपरिषदांमार्फत जन्म व मृत्यू दाखले वितरीत करण्यात येत आहेत. परंतु सदर पोर्टलची गती अतिषय कमी झाल्यामुळे आधी दिवसाला १०० दाखले दिले जात होते तर आता फक्त २० ते २५ दाखले दिवसातून दिले जात आहेत.
यामुळे नागरिकांना १५ ते ३० दिवस दाखल्यांसाठी महानगरपालिकांमध्ये चकरा माराव्या लागत आहेत. महाराष्ट्र शासनाने विकसीत केलेल्या डीसीसीआरएस पोर्टलमध्ये अनेक त्रुटी आहेत. या त्रुटींचा नागरिकांना फटका बसत आहे. कधी ओटीपी येत नाही तर कधी दाखले डाऊनलोड होत नाही, तसेच कधी कागदपत्र अपलोड होत नाही तर, कधी दाखल्यामध्ये दुरुस्ती होत नसल्याच्या समस्या येत असल्यामुळे कर्मचार्यांसह नागरीक त्रस्त झाले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेत जन्म-मृत्यू विभागात मृत्यचे दाखले काढण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. बहुतांश नागरिक घरातील एखादा व्यक्ती वारल्यानंतर घराचा उतारर्यावर किंवा जमिनीच्या उतार्यावरुन नाव कमी करुन घेण्यासाठी आणि घरातील कर्त्या व्यक्तीचे नाव लावण्यासाठी शासकीय कामानिमित्त मृत्यू दाखला आवश्यक झालेला आहे. या महत्वाच्या कागदपत्रांसाठी ऐनवेळी नागरिकांना फिराफिर करावी लागत असल्याचे अनुभव अनेकांना येत आहे. त्यामुळे घरातील एखादा व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या उत्तरकार्य संपल्यानंतर मृत्यू दाखल्याचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात पायपीट करावी लागत असते. यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Pachora : तात्काळ ट्रांसफार्मर सुरू करा अन्यथा…. पाचोर्यात उद्धव सेना आक्रमक…
Jalgaon : अतीपावसामुळे जिल्ह्यात नुकसान, पालकमंत्र्यांचे त्वरित पंचनाम्याचे आदेश