Bike Chori : परजिल्ह्यातील अट्टल दुचाकी चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात, चोरीच्या 5 दुचाकी हस्तगत
हॅलो जनता न्युज जळगाव – Bike Chori
जळगाव जिल्ह्यासह शहरात दुचाकी चोरट्यांचे प्रमाण वाढले असून या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस दलाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वूमीवर धडक कारवाई करत जळगाव शहरातील एम आय डी सी पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरासह पाच चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की, दि. 22 रोजी एम आय डी सी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपणीय बातमी मिळाली की, एमआयडीसी अजिंठा चौकात एक व्यक्ती हा चोरीच्या मोटार सायकली विक्रीसाठी येणार आहे. या गोपणीय माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोना योगेश बारी, फिरोज तडवी, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी, राहुल रगडे यांचे पथक तयार करण्यात आले.
अजिंठा चौफुली येथे साध्या वेषात थांबुन पोलिसांनी छत्रपती संभाजी नगर येथील दिपक प्रेमसिंग सोळंके रा. वरठाण ता. सोयगांव यास ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याचेजवळ आढळून आलेली एच एफ डीलक्स कंपनीची दुचाकीसंदर्भात जिल्हापेठ पोलीस स्थानकात मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल असून जळगाव शहरातुन 03, छत्रपती संभाजीनगर येथुन 01, आणी अडावद येथुन 01 अशा एकुण 05 मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. सदर आरोपीकडून या सर्व दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
Dr. Ashok Uike : ब्रेकिंग : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर