Airoplane Crash : कझाकस्तानमध्ये भीषण विमान अपघात: ४२ जणांचा मृत्यू, पक्ष्यांच्या थवेने उडवली दुर्घटनेची ठिणगी
हॅलो जनता न्युज, बाकु
कझाकस्तानमध्ये अझरबैजान एअरलाइन्सच्या एका विमानाला भीषण अपघात (Airoplane Crash) झाला आहे. या दुर्घटनेत विमानाचे अक्षरशः तुकडे झाले असून, आपत्कालीन मंत्रालयाच्या माहितीनुसार, विमानात ७० प्रवासी होते. सध्या उपलब्ध माहितीनुसार, किमान ३० जण मृत्यूमुखी पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार मृतांची संख्या ४२ पर्यंत पोहोचली आहे.
अपघाताच्या आधी वैमानिकांनी आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली होती. हे विमान अझरबैजानहून रशियाच्या चेचन्या प्रांतातील ग्रोझनीकडे जात होते. मात्र, कझाकस्तानच्या अकताऊ शहराजवळील कॅस्पियन समुद्र किनाऱ्यापासून सुमारे ३ किमी अंतरावर विमानाला आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
माहितीनुसार, विमान (Airoplane Crash) हवेत असताना पक्ष्यांच्या थव्याशी टक्कर झाली आणि त्यानंतर विमानाच्या ऑक्सिजन टँकमध्ये स्फोट झाला. या घटनेमुळे विमानाने जमिनीवर उतरताच आगीचा भडका उडाला. फुटेजमध्ये हे विमान दोन तुकड्यांमध्ये विभागलेले दिसते.
अझरबैजान एअरलाइन्सच्या J2-8243 क्रमांकाचे हे विमान धुक्यामुळे मार्ग बदलून अक्ताऊ शहराजवळ लँडिंगचा प्रयत्न करत होते. लँडिंग गिअर खाली करून विमान वेगाने जमिनीकडे झेपावले, मात्र जमिनीवर पोहोचताच त्याला आग लागली. दुर्घटनेची चौकशी सुरू असून मृतांचा आणि जखमींचा आकडा अद्याप निश्चित नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या