Dharangaon : चांदसर तलाठी हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा: वाळूमाफियांशी रात्रीच्या सौद्याचा पर्दाफाश!
हॅलो जनता न्युज, धरणगाव :
धरणगाव (Dharangaon) तालुक्यातील चांदसर येथील तलाठी हल्ला प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान अटकेतील आरोपींच्या मोबाइल तपासातून एका तलाठ्याचा वाळूमाफियांशी मध्यरात्रीनंतर संपर्क असल्याचे उघड झाले आहे. वाळू उपसा करणाऱ्यांना मदत करण्यासाठी पथकाला योग्य मार्ग मिळावा, यासाठी संबंधित तलाठ्याने माफियांशी संपर्क साधल्याचा संशय महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या खुलाशामुळे तलाठ्याची भूमिका संशयास्पद ठरली असून, तो सध्या पोलिसांच्या रडारवर आहे.
गिरणा नदीपात्रात कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या पथकातील तलाठी पाटील यांच्या पायावर फावड्याने हल्ला केला, ज्यामुळे पाटील यांच्या पायाचे हाड मोडले. हल्ल्यानंतर पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आणि दोन ट्रॅक्टरसह चौघांना अटक केली.
Dharangaon : तलाठी एका आरोपीसोबत संपर्कात
तपासाच्या दरम्यान, आरोपींच्या मोबाइल डेटा तपासणीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. हल्ल्याच्या रात्री पथकातील एक तलाठी एका आरोपीसोबत संपर्क साधत असल्याचे पोलिसांनी उघड केले आहे. आरोपींकडून याची पडताळणी केल्यानंतर, या तलाठ्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, संबंधित तलाठी कारवाईसाठी गेलेल्या पथकात समाविष्ट होता. पथकातील सदस्यांसमोरच, वाळूमाफियांचे लोकेशन शोधण्यासाठी त्याने एक आरोपीशी संपर्क साधला होता. महसुली सूत्रांनी याबाबत खुलासा करत, तलाठ्याने माफियांशी थेट संपर्क केल्याची माहिती दिली आहे.
Jalgaon Crime : सुप्रीम कॉलनीत एअरगनद्वारे दहशत माजवणाऱ्याला पोलिसांनी केले अटक!
Burning Car : उभ्या कारने घेतला पेट, सोडा प्यायला थांबले अन् थोडक्यात बचावले
Dr. Ashok Uike : ब्रेकिंग : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर