धक्कादायक ! फ्रीजमध्ये सापडला महिलेचा मृतदेह
हॅलो जनता न्युज :
मध्य प्रदेशातील देवासमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, ज्यात एका महिलेचा मृतदेह एका फ्रीजमध्ये सापडला आहे. या महिलेची 10 महिन्यांपूर्वी हत्या केली गेली होती. आरोपी तिचा लिव्ह-इन पार्टनर होता, ज्याने खून केल्यानंतर मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून तेथून पळ काढला होता. पोलिसांनी आरोपीला उज्जैन येथून अटक केली आहे.
घरातून दुर्गंधी येण्याची तक्रार शेजाऱ्यांनी पोलिसांकडे केली होती. यावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खोली उघडली आणि फ्रीजमधून मृतदेह बाहेर काढला. बीएनपी पोलीस स्टेशन प्रभारी अमित सोलंकी यांनी सांगितले की, जमीनमालक धीरेंद्र श्रीवास्तव यांनी जुलै 2023 मध्ये संजय पाटीदारला घर भाड्याने दिले होते. संजयने जून 2024 मध्ये घर सोडले, पण फ्रीजसह काही सामान एका खोलीत ठेवले होते, जिथे महिलेचा मृतदेह सापडला.
एसपी पुनीत गेहलोद यांच्या माहितीनुसार, बलवीर राजपूत हा इंदूरचा रहिवासी होता आणि तो अनेक महिने या घरात भाड्याने राहत होता. त्याने एका खोलीतून दोन खोल्या बंद केल्या होत्या, आणि गुरुवारी या खोल्यांची साफसफाई केली. शुक्रवारी सकाळी फ्रिज उघडल्यावर आत एका महिलेचा मृतदेह आढळला.
बलवीरच्या माहितीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आणि समजले की, संजय पाटीदार हा इंगोरिया, उज्जैन येथील रहिवासी होता आणि त्याने या घरात पिंकी उर्फ प्रतिभा प्रजापतीसोबत राहणारा. शेजाऱ्यांनी सांगितले की, मार्च 2024 नंतर त्यांना प्रतिभा दिसली नाही. संजयने सांगितले होते की, ती माहेरी गेली आहे. पोलिसांनी संजयला उज्जैन येथून अटक केली.
आरोपी संजयने सांगितले की, तो प्रतिभासोबत पाच वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. ती त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती आणि यामुळे तो कंटाळला होता. तो आणि त्याचा मित्र विनोद दवे याने तिच्या हत्येचा कट रचला आणि मार्च 2024 मध्ये तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला. फ्रिजवर कापड झाकून आणि खोलीला कुलूप लावून संजय पळून गेला.
पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या शवविच्छेदनासाठी डॉक्टरांचे पॅनेल नियुक्त केले जाईल. विनोद दवे याच्यावर राजस्थानमधील टोंक येथे गुन्हा दाखल आहे आणि तो तुरुंगात आहे. संजयला रिमांडवर घेत चौकशी केली जाईल. पोलीस अजूनही या प्रकरणाची सखोल तपासणी करत आहेत.
देशाच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकेला अभिवादन, फातिमा शेख यांच्या कार्याचा सन्मान
Santosh Deshamukh : जालना मोर्चात मुलीची भावुक हाक – ‘तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून का मारला?’