अष्टविनायक कॉलनीत गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर भव्य सोहळा, आमदार अमोल पाटील यांचा सत्कार
हॅलो जनता न्युज,
सालाबादप्रमाणे यंदा अष्टविनायक कॉलनी व मित्र मंडळाकडून गणेश जयंती मोठ्या प्रमाणात आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. यंदाच्या उत्सवात भव्य भंडाऱ्याचे आयोजन देखील करण्यात आले. या कार्यक्रमाला खास उपस्थित राहिले, आमदार अमोल चिमणराव पाटील आणि त्यांची धर्मपत्नी सौ. मृणाली अमोल पाटील, ज्यांच्या हस्ते गणपतीची आरती ठेवण्यात आली. यावेळी आमदार अमोल पाटील यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल अष्टविनायक कॉलनीकडून विशेष सत्कार देखील करण्यात आला.
कार्यक्रमाला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी देखील उपस्थित होते. यासोबतच अष्टविनायक कॉलनीतील मित्र मंडळाचे सहकार्य खूप मोलाचे ठरले. श्री संदीप शिंपी, श्री जितेंद्र महाजन, राजेश ठाकूर, दिनेश पाटील, राहुल ठाकूर, दर्शन पाटील, करण वाघ, योगेश जाधव, राम जयस्वाल, हरिष चौधरी, विवेक पाटील, परेश मराठी, अभी पाटील आणि अन्य सर्व मित्र मंडळ सदस्यांनी अनमोल सहकार्य केले.
Bhusawal Crime : भुसावळमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण, गुन्हा दाखल !
Shevga farming : शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ; शेवगाच्या पाल्याची पावडर थेट अमेरिकेत निर्यात