Jalgaon : जळगावातील रामदेववाडी अपघात प्रकरण : तिन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, आरोपींच्या वकीलाकडून चौथ्या आरोपीचा उल्लेख
हॅलो जनता ( जळगाव) जळगावातील (Jalgaon) रामदेववाडी अपघात प्रकरणात तिन्ही आरोपींची आज न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश सोनवणे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली होती. तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. अर्णव कौल, अखिलेश पवार आणि ध्रुव सोनवणे असे तिन्ही आरोपींची नावे असून यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
७ मे रोजी जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी गावाजवळ झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला झाला असून पोलिसांनी याप्रकरणी १८ दिवसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांना प्रथमतः तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती त्यांनतर आज पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Jalgaon : अचानक १८ दिवसांनी चौथ्या संशयिताचा आरोपीच्या वकिलांकडून उल्लेख…
आज आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करताना अर्णव कौल यांचा मुंबई येथील आझाद पोलीस स्थानकात जबाब घेतला होता त्या ठिकाणी त्याने चौथ्या आरोपीचे नाव सांगितले असल्याचे देखील सांगितले आहे. त्यामुळे या अपघात प्रकरणात आता लवकरच चौथ्या आरोपी अटक होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे फिर्यादी यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत आम्हाला न्याय मिळेल का? अशी भावना व्यक्त केली आहे. महत्वाचे म्हणजे इतके दिवस होवूनही त्यांच्या रक्ताचे अहवाल अजून आलेले नाहीत, त्यामुळे गरिबांना न्याय मिळणार नसल्याचे एकंदर परिसथिती वरून दिसत असून न्याय मिळविण्यासाठी आम्हाला उपोषण करावे लागेल अशी प्रतिक्रिया फिर्यदिनेने दिले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढील सुनावणीच्या वेळी नेमके काय घडते याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Jalgaon : धक्कादायक ! वादळात घर कोसळून चौघे जागीच ठार तर मोठा मुलगा थोडक्यात बचावला…