विश्वकर्मा समाज संघटन बळकट करण्याचा निर्धार ; भाजप विश्वकर्मा सेलची जळगावात दमदार बैठक.

बैठकीत केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विश्वकर्मा समाजातील कारागीर, उद्योजक, युवक व महिलांना शासनाच्या विविध योजनांशी जोडून त्यांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले.
यावेळी बोलताना अध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने तळागाळात जाऊन सक्रियपणे कार्य करण्याचे आवाहन केले. आगामी काळात विश्वकर्मा सेलची ताकद वाढवून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी उपक्रम राबविण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
बैठकीस विश्वकर्मा सेलचे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष संजय विसपुते, महेश वर्मा, संजय जगताप, संजय दीक्षित, संजय पगार, विजय शेवाळे, संदीप डोलारे, धीरज वर्मा, विनोद दंडगव्हाळ, प्रमोद रूले यांच्यासह विश्वकर्मा समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले. विश्वकर्मा सेलच्या माध्यमातून समाजहित, संघटन बळकटी आणि जनसेवा हीच प्राथमिकता ठेवून आगामी काळात अधिक प्रभावी व व्यापक उपक्रम राबविण्याचा एकमताने संकल्प करण्यात आला.



