हॅलो सामाजिकहॅलो डॉक्टर

लोकसेवा मंडळच्या रुग्णमित्रांतर्फे शासकीय रुग्णालयात “डॉक्टर्स डे” साजरा.

जळगाव शहरातील शासकीय रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांना मदत -माहिती मार्गदर्शन चे काम लोकसेवा मंडळचे रुग्णमित्र करत असतात. डॉक्टरांच्या सेवे मुळे आपल्या सर्वांचे आरोग्य सुरक्षित राहते या कृतज्ञता भावनेतून जळगाव शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय , शासकीय महिला रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय , नानीबाई रुग्णालय येथे लोकसेवा मंडळच्या रुग्णमित्रांतर्फे “डॉक्टर्स डे” निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 

या रुग्णालयांमध्ये रुग्णमित्रांनी उपस्थित होत तेथील डॉक्टर्सना गुलाब पुष्प देत त्यांच्या रुग्णसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालयात- सभागृहात तेथील प्रभारी अधिष्ठाता , वैद्यकीय अधिक्षक यांच्या सह सर्व मुख्य डॉक्टर्स , विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि इन्टर्स डॉक्टर साधारण यांच्या उपस्थिति मध्ये कार्यक्रम झाला. तेथे रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ शर्मिली सुर्यवंशी मॅडम यांनी संबोधित केले. त्यांनी डॉक्टरांच्या सेवाभावी वृत्ति आणि नैतिक मूल्ये या द्वारे रुग्णांची सेवा करण्याचे मार्गदर्शन केले तसेच रुग्णमित्रांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. उप वैद्यकीय अधिक्षक डॉ अपूर्वा बारी, आर एम ओ डॉ राहुल चौधरी , प्राध्यापक डॉ सीमा गिरी आदि सर्वांनी कार्यक्रमा बद्दल समाधान व्यक्त केले.

शासकीय महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ श्री किरण सोनवणे, नानीबाई रुग्णालयाच्या डॉ सोनल कुलकर्णी आणि इतर वरिष्ठ डॉक्टरांनी रुग्णमित्रांच्या या उपक्रमाची स्तुति केली आणि कार्यक्रमा बद्दल व्यक्त केले.

रुग्णमित्रांतर्फे श्री विनोद जी कोळी, भुषण शिवदे, ईश्वर सुर्यवंशी, भुषण सुर्यवंशी, किशोर बोरसे , चंद्रकांत तायड़े , यशवंत कापडे, दुर्गाताई कापडे, राजगोपाल पालिवाल, मोहनलाल पालीवाल, शरद बोरसे, हरिष तेली, बेबिताई सुर्यवंशी , शाम लाठी, पुरुषोत्तम राजपूत, हर्षल सुर्यवंशी, नीलेश देवरे , अनुप काळे आदि रुग्णमित्र उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button