महिला सुरक्षा, बंधुता आणि सौहार्दाचा संदेश देणारी होळी ; गुढे गावाचा आदर्श उपक्रम
भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील
पारंपरिक होळी दहनाला सामाजिक आशयाची जोड देत मंडळाने समाजातील अपप्रवृत्ती आणि घातक कृत्यांविरोधात ठाम भूमिका मांडली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विधिवत पूजन करून उपस्थित ग्रामस्थांना उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केले.

“वाईट विचारांचा त्याग करून चांगल्या संस्कारांचा स्वीकार करणे हीच खरी होळी आहे,” असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमात तरुणाईचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. ग्रामस्थांनीही या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत मंडळाच्या सामाजिक बांधिलकीची प्रशंसा केली. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक विचारांची पेरणी होते, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचा समारोप सर्वांनी एकत्र येऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प करण्यात आला. गुढे गावातील या उपक्रमामुळे सामाजिक जागरूकतेचा नवा आदर्श निर्माण झाला असून, “वाईट विचारांचे दहन आणि चांगल्या संस्कारांचे रोपण” हा संदेश सर्वदूर पोहोचत आहे.



