⁠हॅलो क्राईम

धक्कादायक : रात्रीच्यावेळी घरात घुसला अन् अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, जीवे मारण्याची धमकी

हॅलो जनता, भडगाव (प्रतिनिधी): भडगाव तालुक्यातील एका गावात रात्रीच्या सुमारास एका नराधमाने घरात घुसून विवाहित महिला व तिच्या अल्पवयीन मुलींवर अश्लील चाळे करत जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेने भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गावात संतापाची लाट उसळली आहे.

पीडित महिला ही आपल्या आजारी पती व चार अल्पवयीन मुलींना घेऊन भडगाव तालुक्यातील एका गावात राहते. शेतात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून त्यांच्या घरासमोरच राहणाऱ्या एका नराधमाने दि. 28 जूनच्या मध्यरात्री 12.30 च्या सुमारास, पीडित महिला, पती व मुलींसह झोपलेल्या असताना त्यांना कोणीतरी हात पकडल्याची जाणीव झाली. जागे होऊन पाहिले असता, नराधम हा अर्धनग्न अवस्थेत त्यांच्या पलंगाजवळ बसलेला होता आणि तो पीडित महिला व त्यांच्या मुलींवर अश्लील प्रकार करीत होता.

अचानक रात्री घरात नराधमाला पाहून महिला व तिच्या मुली घाबरल्या, आरडाओरड केल्यानंतर पीडित महिलेचे पतीही जागे झाले. त्यावेळी आरोपीने अत्यंत गलिच्छ व जातीवाचक शब्दांत शिवीगाळ करत दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिला घाबरून मुलींना घेऊन घरातील दुसऱ्या खोलीत गेली व दरवाजा आतून बंद केला.

त्यानंतरही आरोपी काही वेळ दरवाज्याबाहेर उभा राहून लाथा मारत शिवीगाळ करत राहिला. सुमारे एक तासानंतर तो निघून गेला. पीडित कुटुंब संपूर्ण रात्री भयभीत अवस्थेत खोलीत बंद होते. सकाळी उजाडल्यावर पीडितेने आपल्या दीरास घटनेची माहिती दिली आणि गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या….

तुमची डिजिटल फसवणूक झाली आहे का? लगेच ही बातमी वाचा…

💥 ब्रेकिंग : जळगाव शहारत तब्बल १०७ धोकादायक इमारती, मनपातर्फे नोटीस

💥 ब्रेकींग – त्र्यंबकेश्वरला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button