आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत खांदेपालट, नवीन चेहऱ्यांना संधी….

हॅलो जनता न्युज, जळगाव
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत खांदेपालट करण्यात आली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा लोकसभा संघटक बदलण्यात आले आहेत.
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करता यावी म्हणून माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या कडे जळगाव जिल्हा प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे तर नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले करण पवार यांना जळगाव लोकसभा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने ठोठावला दंड, काय आहे नेमका प्रकार…
पाचोऱ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक, विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन
चौकशीतील दिरंगाई चोपडा पोलिसांच्या अंगाशी, नेमका काय आहे प्रकार…