C P Radhakrishnan : राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा जळगाव जिल्हा दौरा
हॅलो जनता न्युज, जळगाव :
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (C P Radhakrishnan) हे बुधवार 08 जानेवारी रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. . .
बुधवार, दि. 08 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 09.15 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे प्रयाण, सकाळी 09.45 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे आगमन, सकाळी 10.00 ते 11.05 वाजेपर्यंत कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या 33 व्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपस्थिती, सकाळी 11.05 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून मोटारीने डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजकडे रवाना, सकाळी 11.30 वाजता राज्यपालांचे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज येथे आगमन, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आयोजित कार्यक्रमाला सकाळी 11.30 ते 12.10 वाजेपर्यंत उपस्थिती, दुपारी 12.10 वाजता डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव येथून मोटारीने रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंड, भुसावळ येथील कार्यक्रमासाठी रवाना, दुपारी 12.30 वाजता रेल्वे क्रीडा मैदान,भुसावळ येथे आगमन
दुपारी 12.30 ते दुपारी 1.20 वाजेपर्यंत राज्यपालांच्या (C P Radhakrishnan) हस्ते रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंड येथे नवीन सिंथेटिक ट्रॅकचे उद्घाटन, ट्रॅक मेंटेनर्स आणि ‘हॉस्पिटल ऑन व्हील’चा सत्कार, दुपारी 1.20 ते दुपारी 3.00 राखीव, दुपारी 3.00 वाजता रेल्वे क्रीडा मैदान, भुसावळ विभाग, भुसावळ येथून मोटारीने जळगाव विमानतळाकडे रवाना, दुपारी 3.40 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व दुपारी 3.45 वाजता शासकीय विमानाने प्रयाण.
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
Jalgaon Fraud : जळगाव शहरातील डॉक्टराची फसवणूक ; काय आहे प्रकरण ?
Shinde Gat : शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली ; तुमच्यापेक्षा तर…