हॅलो राजकारण

Shinde Gat : शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली ; तुमच्यापेक्षा तर…

हॅलो जनता न्युज, मुंबई :

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचं शपथविधी पार पडले असून, मंत्रीपदांची आणि खातेवाटपाची प्रक्रिया यथावत पूर्ण झाली आहे. मात्र, आता राज्यातील राजकीय वातावरणात एक नवा वाद उभा राहिला आहे, ज्यामुळे शिवसेना (एकनाथ शिंदे गट Shinde Gat) आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे.

Shinde Gat : तुमच्यापेक्षा तर…
रविवारी बुलढाण्यात आयोजित एका जाहीर सभेत संजय गायकवाड यांनी मतदारांवर गंभीर आरोप केले आणि त्यांना कठोर शब्दात शिवीगाळ केली. गायकवाड यांचे वक्तव्य थेट मतदारांना उद्देशून होते, ज्यात त्यांनी मतदानांना पैशांमध्ये विकले जाणारे म्हटले. “तुम्ही मला साधं एक मत देऊ शकत नाही? फक्त दारू, मटण, पैसे? दोन हजारांत विकले गेले साले, पाच हजारांत? तुमच्यापेक्षा तर रांXX बऱ्या!” असे ते म्हणाले. “समजा मी पडलो असतो तर सगळे प्रकल्प होऊ शकले असते का? एक खडाही पडला नसता,” असा दावाही त्यांनी केला.

या वक्तव्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, गायकवाड यांच्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. या घटनेमुळे आगामी काळात अधिक राजकीय वादविवाद होण्याची शक्यता आहे.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon BJP : भा.ज.पा. सदस्य नोंदणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार

Sthal movie : सचिन पिळगांवकर आणि ‘स्थळ’ चित्रपटाची नवी इनिंग; महिला दिनानिमित्त प्रदर्शित होणार चित्रपट

Manoj Jarange Patil : केसाला जर धक्का लागला तर… – मनोज जरांगे पाटलांचा मुंडेंना इशारा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button