Vidhansabha nivdbuk : मतदानासाठी बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य : आयोग
हॅलो जनता, मुंबई Vidhansabha nivdbuk :
मुंबई : विधानसभेसाठी (Vidhansabha nivdbuk) २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानावेळी मतदार यादीत नाव असणाऱ्या मतदारांसाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यावर मतदारांना मतदान करता येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने शनिवारी दिली आहे.
मतदार ओळखपत्र आहे त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मात्र, मतदार यादी नाव असूनही ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नाही अशांसाठी १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. मतदाराने पत्ता मध्ये बदल केला असेल मात्र नवे ओळखपत्र मिळाले नसल्यास आधीच्या ओळखपत्रावर मतदान करता येईल. मात्र, त्याचे नाव बदललेल्या पत्यासह मतदार यादीत असणे आवश्यक असेल
१. आधार कार्ड
२. पंन कार्ड
३. ड्रायव्हिंग लायसन्स
४. पासपोर्ट
५. मनरेगा अंतर्गत दिलेले जॉबकार्ड
६. बँक, पोस्टाकडून देण्यात आलेले छायाचित्रासह पासबुक
७. कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
८. जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड
९. निवृत्तीवेतनाचे दस्तावेज केंद्र, राज्य, तसेच सार्वजनिक
१०. क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र
११. संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले ओळखपत्र
१२. दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले केंद्र सरकारचे विशेष ओळखपत्र
Murder case : धक्कादायक : या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून