मेंढपाळ कुटुंबातील ११ वर्षीय मुलाला सर्पदंश, संदीप सावळे यांच्या तत्काळ मदतीने वाचले प्राण
हॅलो जनता, रावेर – अहीरवाडी शेती शिवारातील एका मेंढपाळ कुटुंबात राहणाऱ्या ११ वर्षीय डिगंबर कोळपे याला साप चावल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच संदीप सावळे यांनी तातडीने मदत करत त्याला रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
घटनेच्या वेळी सकाळी दहाच्या सुमारास डिगंबर आपल्या झोपडीत असताना सापाने त्याला चावले. त्यावेळी तेथे उपस्थित वामन कोडके व बाळू कोळपे यांनी संदीप सावळे यांना तातडीने कळवले. सावळे यांनी विलंब न करता आपल्या गाडीतून डिगंबरला रावेर ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्वरित उपचार करून डिगंबरची तब्येत सुधारली आहे.
डिगंबर कोळपे आता ठीक आहे असून, त्याच्या कुटुंबाने संदीप सावळे यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या तत्परतेमुळे एक गंभीर घटना टळली आणि डिगंबरचे प्राण वाचले. आणि त्वरित प्रतिसादामुळे या प्रकारात सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….
मग समोर कुणालाही येवू द्या, दिलीप खोडपेंच्या भूमिकेवर मंत्री महाजन यांची प्रतिक्रिया
विद्यमान आमदारांनी मतदारसंघ भकास करण्याचे पाप केले आहे, सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांची टीका…