हॅलो राजकारण
National congress : काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमजद पठाण यांची निवड
हॅलो जनता जळगाव | जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या (National congress) जिल्हा उपाध्यक्ष पदी अमजद पठाण यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी त्यांची निवड जाहीर केली.
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी अमजद पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमजद पठाण यांना अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष पदावरून ही पदोन्नती देण्यात आली आहे. आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते अमजद पठाण यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.
प्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, प्रभाकर अप्पा सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी, जमील शेख, सचिन सोमवंशी, गजानन मालपुरे, पिरनअनुष्ठान, मनोज चौधरी, मुनव्वर खान, हमीद शेख, यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.