जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, शासकीय ज्वारी खरेदीसाठी उद्दिष्ट वाढले इतक्या शेतकऱ्यांना होणार फायदा….
हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर संदेश प्राप्त होताच वेळेत विक्रीसाठी आणवेत असे आवाहन महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित दिलीप निकम यांनी केले आहे. जिल्ह्यासाठी ९५ हजार क्विंटल उद्दिष्ट होते ते अजून ९० हजारांनी क्विंटल ने वाढले आहे. त्यापैकी ८४ हजार ११२ क्विंटल ज्वारी खरेदी झालेली आहे. याकरिता आता ३१ ऑगस्टपर्यंत ज्वारी खरेदीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
जळगाव जिल्हयात ज्वारी खरेदीसाठी १८ केंद्र कार्यरत आहेत. जिल्हयात एकुण ५ हजार ३२७ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. दिनांक ३१ जुलै २०२४ अखेर २ हजार ४१५ शेतकऱ्याकडुन ८४ हजार ११२ क्विंटल ज्वारी खरेदी झालेली आहे. ज्वारी खरेदीसाठी जिल्हयाकरीता एकुण ९५ हजार क्विंटल उद्दिष्ट प्राप्त झाले होते.
राज्य शासन, केंद्र शासनाकडील पाठपुराव्यामुळे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने जिल्ह्याला ज्वारी खरेदीचे वाढीव उद्दिष्ट मिळाले असल्याची माहिती राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या..
Unmesha Patil : माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या भगव्या सप्ताहास जोरदार प्रतिसाद
Ajeet Pawar : विधानसभा निवडणुकीत ठरलं, हा आहे अजित पवार गटाचा “मेगा प्लॅन”
Birth- Death Certificate : सर्व्हर डाऊन मुळे जन्म मृत्यूच्या दाखल्यांसाठी नातेवाईकांच्या हेलपाट्या