मनसे भाजप युती, अमित ठाकरे यांनी घेतली भाजपच्या मंत्र्याची भेट…

हॅलो जनता न्यूज, मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते मंत्री आशिष शेलार यांची विशेष भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
अमित ठाकरे हे अलिकडच्या काळात स्वतःच्या राजकीय भूमिका स्पष्ट करताना दिसत आहेत. विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढला असून, ते स्वतंत्रपणे नेतृत्व उभे करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी शेलार यांची घेतलेली ही भेट महत्वाची मानली जात आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी मुंबईतील सध्याच्या राजकीय घडामोडी, आगामी निवडणुका आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मनसे भाजप युती : मुंबई महापालिका निवडणूक, अमित ठाकरे यांची भेट महत्वाची…
अमित ठाकरे यांच्या या पावलाकडे राजकीय तज्ज्ञ वेगळ्या नजरेतून पाहत आहेत. मनसेच्या आगामी राजकीय धोरणाचा हा एक भाग असू शकतो का, यावरही चर्चांना उधाण आले आहे. तर भाजप-मनसे युतीच्या चर्चांना या भेटीमुळे नव्याने जोर मिळाल्याचे मानले जात आहे.
मुंबई महापालिका निवडणुका, आगामी विधानसभेचे समीकरण आणि मराठी मतदारांच्या राजकीय भावना या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे व आशिष शेलार यांची झालेली ही भेट विशेष महत्वाची मानली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
💥 ब्रेकिंग : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांवर परप्रांतीयांचा डल्ला, छगन भुजबळांची नाराजी….