हॅलो शिक्षण

शाळेत शिकवणार भगवद्गीता, ‘ या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – उत्तराखंड राज्यातील शाळांमध्ये प्रार्थनेसोबतच विद्यार्थ्यांना भगवद्‌गीतेचे श्लोक शिकवले जाणार आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात अधिकृत आदेश काढला असून, लवकरच याची अंमलबजावणी राज्यातील १७ हजार शासकीय शाळांमध्ये केली जाणार आहे.

आजचा हवामान अंदाज 

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शिक्षण विभागाची एक समीक्षा बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विद्यार्थ्यांना गीतेतील श्लोक शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला. भगवद्‌गीता हा. एक पवित्र ग्रंथ आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले ज्ञान या ग्रंथात समाविष्ट आहे. हे ज्ञान समजून घेतले, तर ते संपूर्ण आयुष्यात उपयोगी पडते.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले या निर्णयाचे नेमके कारण…

त्यामुळेच राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये गीतेचे शिक्षण दिले जाणार आहे, असे मुख्यमंत्री धामी यांनी सांगितलेया निर्णयामुळे समाजात बंधुभावाची भावना वृद्धिंगत होईल आणि राज्य प्रगत होईल. आजवर जे काही घटक आपल्यामध्ये फूट निर्माण करत होते, ते दूर होतील. हाच उद्देश समोर ठेवून आम्ही मदरशांमध्ये संस्कृत शिकवण्यासाठी संस्कृत विभागासोबत एमओयू करण्याचा निर्णय घेतला.

उत्तराखंड सरकारचा हा निर्णय केवळ धार्मिक ग्रंथ शिकवण्यापुरता मर्यादित नसून, समाजात परस्पर समज वाढवणे, : सांस्कृतिक ज्ञान वृद्धिंगत करणेआणि शिक्षणातून मूल्यसंस्कार देणे, हाच यामागचा उद्देश असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे, असे मुफ्ती काजमी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे मदरसा बोर्डाने केले स्वागत

या निर्णयाचे मदरसा बोर्डाच्या अध्यक्षांकडूनही स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उत्तराखंड हे राज्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. शाळांमध्ये भगवद्‌गीतेचा अभ्यासक्रमात समावेश होणे ही आनंदाची बाब आहे. लोकांना भगवान श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या जीवनकार्याची ओळख करून देणे आणि त्यातून प्रेरणा घेणे गरजेचे आहे, असे उत्तराखंड मदरसा बोर्डाचे अध्यक्ष मुफ्ती शमून काजमी यांनी या निर्णयाचे समर्थन करत म्हटले.

महत्वाच्या बातम्या….

💥 ब्रेकिंग : आता पत्नीकडे फोन, बँकेचे पासवर्ड मागणे हा गुन्हा, उच्च न्यायालयाचा निर्णय

💥 ब्रेकिंग : पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांचा जळगावात भव्य नागरी सत्कार..

💥 ब्रेकिंग : जळगावात छावा संघटना आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत केली ही मागणी….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button