ब्रेकिंग : पाचोरा भडगाव मतदार संघात कोण मारणार बाजी? सट्टा बाजारात विद्यमान आमदारांची हवा.
हॅलो जनता न्यूज – मुंबई
विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असून कोणत्या मतदारसंघात कोण जिंकून येईल? राज्यात कोणाची सत्ता येईल यावर सट्टा बाजारात मोठी उलाढाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पाचोरा भडगाव मतदार संघात महायुतीकडून आमदार किशोर पाटील, महाविकास आघाडी कडून वैशाली सूर्यवंशी तर भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार दिलीप वाघ, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रताप पाटील अशी पंचरंगी लढत पाचोरा भडगाव मतदार संघात पाहायला मिळत आहे.
मात्र या लढतीत कोण बाजी मारणार? जनता कुणाच्या बाजूने कौल देणार हे 23 नोव्हेंबर रोजी समजणार आहे. तथापि 20 नोव्हेंबर. रोजी म्हणजेच उद्या मतदान प्रक्रियाही पार पडणार असून सट्टा बाजारात पाचोरा भडगाव मतदार संघात कोण जिंकून येणार यावर मोठी उलाढाल होताना दिसत आहे. जात सर्वात जास्त सट्टा हा आमदार किशोर पाटील यांच्या विजयावर लावलेला दिसत असून त्यानंतर वैशाली सूर्यवंशी, दिलीप वाघ आणि अमोल शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे सध्या तरी सट्टा बाजाराच्या आकडे हे आमदार किशोर पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असे दाखवत आहे.
20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया ही पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर जनता नेमकी कुणाच्या बाजूने कौल देईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या तरी सट्टा बाजारात आमदार किशोर पाटलांची हवा आपल्याला पाहायला मिळत असून त्यांचे पारडे जड असल्याचे पाहायला मिळत आहे.
नोंद – (सट्टा बाजाराचे अंदाज हे वेगळे असू शकतात, सट्टा खेळणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे हॅलो जनता हे बाजाराच्या आकड्यांचे समर्थन करत नाही)
इतर महत्त्वाच्या बातम्या….
Vidhansabha nivdbuk : मतदानासाठी बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य : आयोग