बैल वाचवले पण शेतकरी मेला, रेल्वे अंडरपास मध्ये साचलेल्या पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू
हॅलो जनता प्रतिनिधी – जळगावमधील आसोदा ते मन्यारखेडा रस्त्यावरील रेल्वे अंडर पास बोगद्यात साचलेल्या पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुकलाल लालचंद माळी असे असोदा येथील मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी शेतात जात असताना त्याने रेल्वेच्या बोगद्यातून जाण्यासाठी बैलगाडी सह बैल पाण्यात टाकले मात्र रेल्वे बोगद्यात साचलेल्या पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडी बुडाली यात घाबरलेली बैल जोडी बाहेर निघाली मात्र बैलगाडीवर असलेल्या शेतकऱ्याला बाहेर निघता आलं नाही.
त्यामुळे शेतकऱ्याचा याच ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शेजारी शेतात काम करणाऱ्या शेतमजूरांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने धाव घेतली. यावेळी त्यांना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून रेल्वे बोगद्याच्या अंडरपास मधून पावसाचे साचलेले पाण्याचा निचरा होत नसल्याचा तक्रारी शिवारातील शेतकरी करत आहेत.
मात्र रेल्वे विभागाने लक्ष न दिल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाने या घटनेची जबाबदारी घेऊन मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत किंवा सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी लावून धरली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या…..
पाणी बचतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरा, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे प्रतिपादन
अमळनेर तालुक्यातील शिरुड गावाच्या उपसरपंच कल्याणी पाटील यांना मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण…
जळगावात सामजिक कार्यकर्त्याचे अनोखे आंदोलन, खड्ड्यांना हार घालत केला मनपाचा निषेध