जनसेवक बंडू सोनार नगरसेवक व्हावे यासाठी रामेश्वरम येथे देवाला साकडे, जय सोमवंशी व तरुणांचा पुढाकार

हॅलो जनता, पाचोरा (प्रतिनिधी) –
पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून निष्कलंक आणि निस्वार्थपणे कार्यरत असलेले जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार यांच्याबाबत जनतेमध्ये विशेष उत्साह आणि आदर निर्माण झाला आहे. कोणतेही पद किंवा राजकीय प्रतिष्ठा न बाळगता समाजाच्या हितासाठी झटणारे बंडू सोनार यांचे कार्य आता अधिकच गाजत आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिक, विशेषतः युवक वर्ग, बंडूभाऊंना या वेळी नगरसेवक व्हावे अशी जोरदार मागणी करीत आहेत. यासाठी शिवसेना पक्ष आणि आमदार किशोरआप्पा पाटील यांचे समर्थनही मिळावे अशी जनतेत अपेक्षा आहे. या जनभावनेचे उदाहरण नुकतेच समोर आले. जय अविनाश सोमवंशी यांच्यासह प्रभागातील काही तरुण रामेश्वरम (तामिळनाडू) येथे महादेवाच्या दर्शनासाठी गेले असता, त्यांनी बंडू सोनार यांना येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत यश मिळावे आणि ते नगरसेवक म्हणून निवडून यावेत, यासाठी साकडे घातले. ही घटना बंडूभाऊंवरील जनतेच्या प्रेमाचे आणि विश्वासाचे जिवंत उदाहरण आहे.
बंडूभाऊ सोनार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य, नागरिकांच्या समस्या सोडविणे, गरजूंना मदत, विविध शासकीय योजनांची माहिती देणे, परिसरात स्वच्छता व रस्ते विकास कामांबाबत पुढाकार घेणे अशा अनेक माध्यमांतून लोकांची मने जिंकली आहेत. त्यांनी पदाच्या हव्यासाशिवाय केलेले कार्य आता जनतेने ओळखले असून त्यांच्यावर खऱ्या अर्थाने “जनसेवक” हे बिरुद फिट बसते.
प्रभागातील जनतेकडून असा सूर व्यक्त होतो आहे की, “या वेळेस बंडूभाऊंच्या प्रामाणिक कार्याची दखल घेऊन त्यांना नगरसेवक पद दिले गेले पाहिजे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा सर्वांगीण विकास होईल, याची खात्री वाटते.” सध्या निवडणुकीचे वातावरण तयार होत असून अनेक दावेदार उमेदवारीसाठी सज्ज झाले आहेत. मात्र बंडूभाऊ सोनार यांच्या निःस्वार्थ आणि लोकाभिमुख कार्यामुळे ते निवडणुकीत आघाडीवर राहतील अशी चर्चाही सोशल मीडियासह नागरिकांमध्ये सुरू आहे.
नगरसेवक पदासाठी बंडू सोनार यांची उमेदवारी जाहीर झाल्यास, प्रभाग क्रमांक ८ मध्ये विकास, पारदर्शकता आणि जनसंपर्क यांचा आदर्श निर्माण होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….
विद्यापीठाच्या परिसर मुलाखतीत सात विद्यार्थ्यांची निवड, कुलगुरूंनी दिल्या शुभेच्छा…
पाचोरा बाजार समितीकडून शेतमाल तारण कर्ज वितरण; २ लाखांचा धनादेश वितरित