“त्या” अपक्ष उमेदवारांचा अर्ज वैध, पाचोरा भडगाव मतदार संघातील पेच सुटला….
हॅलो जनता न्यूज, पाचोरा
विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर पाचोरा तहसील कार्यालयात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या त्यात्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान पाचोऱ्यात निवडणूक प्रशासनाच्या दारी आक्षेपांचा पाऊस पडला आणि नामसाधर्म्याच्या कारणावरून दोन गट आमने-सामने आले. यावरून अनेक वादंग झाले प्रत्येक उमेदवाराने पत्रकार परिषद घेऊन आपल्या तेथे स्पर्धेत उमेदवारांवर अनेक आरोप प्रत्यारोप केले. यासंदर्भात प्रशासनाने मध्यरात्रीपर्यंत सुनावणी घेतली आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दोन्ही अपक्ष उमेदवारांची अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत प्रशासनाने मध्यरात्री आदेश जारी करीत आरोप-प्रत्यारोपांचा खेळ संपविला.
पाचोरा विधानसभा मतदारसंघात वैशाली नरेंद्रसिंह सूर्यवंशी या उद्धवसेनेकडून तर अमोल पंडीतराव शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. या उमेदवारांशिवाय नामसाधर्म्याचा फटका बसू नये, यादृष्टीने वैशाली नरेंद्रसिंह सूर्यवंशी आणि अमोल पंडीतराव शिंदे यांनी उमेदवारी अर्जाच्या छाननीदरम्यान अन्य दोघांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदविले. निवडणूक निर्णय अधिकारी भूषण अहिरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय बनसोडे यांनी दोघांचे आक्षेप दाखल करून घेतले.
त्यानुसार बुधवारी दोन्ही उमेदवारांच्या बाजूंनी विधी तज्ज्ञांनी युक्तिवाद सादर केला. सुनावणीदरम्यान आक्षेप नोंदविण्यावरुन काहीसा तेढही निर्माण झाला. त्यामुळे सुनावणी लांबत गेली. रात्री ११ वाजता सुनावणी संपल्यानंतर भूषण अहिरे यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दोघा अपक्ष उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले. वैशाली किरण सूर्यवंशी आणि अमोल शांताराम शिंदे यांनीसुद्धा अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या….
Gold Market Jalgaon : “धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या किंमतीत घट: खरेदीसाठी सोनेरी संधी!”
ब्रेकिंग: डॉ. संभाजी राजे पाटील उद्या पारोळा एरंडोल मतदारसंघातून दाखल करणार उमेदवारी अर्ज..