हॅलो सामाजिक

ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांची पाचोरा येथील “मे मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स पिंपळगावकर” सुवर्णपेढीला भेट

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – येथे आयोजित शारदीय व्याख्यानमाला कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. आपल्या प्रभावी वक्तृत्व, स्पष्ट भूमिका आणि तंत्रज्ञान विषयातील सखोल ज्ञानासाठी ओळखले जाणारे डॉ. निरगुडकर हे पूर्वी Zee 24 Taas या वृत्तवाहिनीचे संपादक होते. सध्या ते भारत सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत आहेत.

पाचोरा दौऱ्यादरम्यान डॉ. निरगुडकर यांनी “मे मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स पिंपळगावकर” या सुवर्णपेढीला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सुवर्णपेढीतील विविध दागिन्यांची पाहणी करून त्यांच्या डिझाइन्स, गुणवत्ता आणि व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

पाचोरा सारख्या शहरात इतके भव्य आणि आधुनिक दालन पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. ग्रामीण व निमशहरी भागातही अशा उच्च दर्जाच्या सुविधा आणि आधुनिक व्यावसायिक दृष्टीकोन पाहून समाधान वाटल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच येत्या काळात अशाच प्रकारचे आणखी एक मोठे दालन एखाद्या महानगरात उभे राहील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

या भेटीमुळे सुवर्णपेढीच्या प्रतिष्ठेत आणखी भर पडली असून स्थानिक व्यावसायिक व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शारदीय व्याख्यानमालेच्या निमित्ताने झालेली ही भेट पाचोरा शहरासाठी विशेष ठरली.

इतर महत्वाच्या बातम्या…

🚨 ब्रेकिंग: शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा – बन्सीलाल पाटील

🚨 ब्रेकिंग: देशाचे नाक कापणाऱ्या काँग्रेसचा जाहीर निषेध, देशाची माफी मागावी – जितेंद्र जैन..

🚨 ब्रेकिंग: गाळण गावात झालेल्या विकास कामात कोणताही भ्रष्ट्राचार नाही, प्रत्यक्ष कामे दाखविण्यास तयार – सरपंच राजेंद्र सावंत…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button