हॅलो राजकारण

पाचोरा मतदारसंघातील माजी आमदार दिलीप वाघ यांचा भाजपात जाहीर प्रवेश, प्रवेशाच्या वेळी नेमके काय घडले..

हॅलो जनता, मुंबई | 27 मे 2025

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आज एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली. पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार श्री. दिलीप वाघ यांनी आपल्या असंख्य समर्थक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. वाघ यांचे पक्षात औपचारिक स्वागत करण्यात आले. श्री. बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत करताना सांगितले की, “दिलीप वाघ यांचा भाजपात प्रवेश हा पक्षासाठी बळकटी देणारा आणि जनतेच्या हितासाठी काम करण्याचा निर्धार मजबूत करणारा आहे.” तसेच त्यांनी वाघ यांना आगामी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण, विधान परिषदेचे अध्यक्ष श्री. राम शिंदे, आमदार श्री. मंगेश चव्हाण, तसेच पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षात आलेल्या नव्या कार्यकर्त्यांचेही भाजपात जोरदार स्वागत करण्यात आले.

दिलीप वाघ यांच्या भाजप प्रवेशामुळे पाचोरा तसेच जळगाव जिल्ह्यातील भाजपाच्या संघटनात्मक ताकदीला नवा आयाम मिळाला आहे. स्थानिक राजकारणातही या घडामोडीचा दूरगामी परिणाम दिसून येईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या….

गांजाची तस्करी उधळली : चोपडा पोलिसांची मोठी कारवाई

चाळीसगावकरांना त्रास देणारी ‘शांताबाई’ अखेर पोलिसांच्या जाळ्यात …

सैनिकांसाठी साखरपुड्यातून मदतीचा हात, जळगावच्या प्रियंका पाटील यांचा स्तुत्य उपक्रम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button