पाचोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतांची आमदार किशोर पाटील यांनी बांधावर जावून केली पाहणी, शेतकऱ्यांनी….
हॅलो जनता (पाचोरा) – जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे कुरंगी, सामनेर यासह इतर गावांमध्ये केळी सह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे शेकडो हेक्टर वरील केळी ही जमीनदोस्त झाली असून लिंबू, मोसंबी यासह इतर फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पाचोरा येथे आयोजित आभार मेळाव्यातील आमदार किशोर पाटील यांचे दमदार भाषणं
https://www.facebook.com/share/v/yukH54FCqiwA4SKn/?mibextid=oFDknk
शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं असल्याने आमदार किशोर पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेताची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानाची व्यथा आमदार किशोर पाटील यांच्याकडे मांडत लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी म्हणून मागणी केली.
अन् आमदारांनी शेतकऱ्यांच्या बांधावरून लावला मंत्र्यांना फोन….
तात्काळ आमदार किशोर पाटील यांनी पाचोर्याचे प्रांताधिकार्यांना फोन करून तात्काळ पंचनामे करून अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्याची निर्देश दिले. तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती त्यांना दिली. यावेळी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून आपण शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी यावेळी आमदार किशोर पाटील यांनी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली असून मंत्री अनिल पाटील यांनी लवकरात लवकर राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मदत मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी शेतकऱ्यांना दिले…
इतर महत्वाच्या बातम्या..
Gold Rate : एकाच दिवसात सोन्याच्या दरात चक्क एवढ्या रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे दर…