⁠हॅलो रोजगार

राज्यातील अनेक अधिकारी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी चौकशीच्या रडारवर, दोन जिल्हाधिकाऱ्यांसह ४०० अधिकाऱ्यांची यादी…

हॅलो जनता, प्रतिनिधी – प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी (IAS) पूजा खेडकर हिचे बिंग फुटल्यानंतर सुरू झालेली चौकशी राज्यातील अनेक अधिकाऱ्यांना भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या राज्यातील एक कृषी उपसंचालक बोगस दिव्यांग प्रमाणपत्र चौकशीच्या रडारवर आहे. याशिवाय, एका “आरटीओ”सह आणखी ३५९ सरकारी अधिकारी पूजा खेडकरच्याच धर्तीवर गोत्यात येण्याची शक्यता आहे.

खेडकर प्रकरणानंतर राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र चौकशी सुरू आहे. त्यात अशा बनावट प्रमाणपत्राच्या माध्यमातून ३५९ अधिकारी सरकारी सेवेत घुसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या सर्व संशयित अधिकाऱ्यांच्या दिव्यांगत्व दाव्याच्या फेर तपासणीचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिलेल्या संशयित अधिकाऱ्यांच्या यादीनुसार आता ही चौकशी सुरू आहे.

राज्यात अनेकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून त्याआधारे नोकरी मिळवली असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात होत्या. या तक्रारींवर योग्य चौकशी केली जात नसल्याचेही आरोप होत होते. त्यानंतर दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी १९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध मोहिम अभियान राबवले होते. त्यानंतर बच्चू कडू यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र असल्याच्या संशय असलेल्या ३५९ शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी तयार केली आहे. आजवर त्यांच्या संदर्भातील तक्रारींची योग्य चौकशी केली न जाता ही प्रकरणे दडपली गेल्याचा आरोप आहे.

बच्चू कडू यांनी तयार केलेल्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारकामध्ये २ आयएएस अधिकारी, ८ तहसीलदार, एक कृषी उपसंचालक, एक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO), एक कृषी उपसंचालक, एक सहाय्यक कर उपायुक्त, एक उपशिक्षणाधिकारी, एक उपजिल्हाधिकारी, एक मुख्याधिकारी यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण ३५९ अधिकारी कर्मचारी आता चौकशीच्या रडारवर आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या..

चांगली विकास कामे केल्याने गावाने केली आमदारांची लाडू तुला, कुठे घडला हा प्रकार….

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पुरामुळे बाधित गावांना भेट,सतर्कता बाळगण्याचे केले आवाहन

पुरणपोळीसह धान्याची रास खाऊ घालत सर्जाराजाप्रती कृतज्ञता, गोदावरी कुटूंबियांतर्फे बैल पोळा सण उत्साहात साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button