⁠हॅलो क्राईम

जिल्ह्यात पुन्हा गोळीबाराचा थरार : मनुदेवी फाट्याजवळ हॉटेल मालकावर गोळीबार

हॅलो जनता न्यूज, यावल, ता.११ जुलै – यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील मनुदेवी फाट्याजवळ* असलेल्या हॉटेल रायबा येथे संध्याकाळी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अज्ञात हल्लेखोरांनी हॉटेलच्या मालकावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

गोळीबार घटनेने खळबळ, प्राथमिक माहिती नुसार…

प्राप्त माहितीनुसार, हॉटेल रायबा हे काही काळ बंद होते. मात्र अलीकडेच हे हॉटेल पुन्हा सुरू करण्यात आले होते. आज संध्याकाळच्या सुमारास दोन तरुण मोटारसायकलवरून हॉटेलमध्ये आले. त्यांनी बीयरची मागणी केली. मात्र, हॉटेलचे मालक प्रमोद श्रीराम बाविस्कर (वय अंदाजे ४०) यांनी बार बंद झाल्याचे सांगून बीयर देण्यास नकार दिला. त्यावरून वाद निर्माण झाला आणि त्यापैकी एक तरुणाने अचानक पिस्तुल काढून गोळ्या झाडल्या.

यावल गोळीबार : गंभीर अवस्थेत रुग्णालयात हलवले

गोळी लागल्याने बाविस्कर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगावच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी अजूनही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरात नाकाबंदी करून संशयितांचा शोध सुरू आहे. घटनास्थळावरून काही पुरावे हस्तगत करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास अधिक वेगाने सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोळीबार : स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण

या थरारक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या भागात अचानक घडलेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. पुढील तपास सुरू असून हल्लेखोर लवकरच जेरबंद होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

मागासवर्गीय कर्मचारी महासंघाची नवीन कार्यकारिणी जाहीर, अरुण सपकाळे यांची कार्याध्यक्षपदी फेरनिवड

💥ब्रेकिंग : क्रिकेट विश्वात खळबळ, या भारतीय क्रिकेटरला होणार दहा वर्षाचा कारावास….

💥ब्रेकिंग : उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे यांची बदली

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button