Eknath khadase : एकनाथ खडसेंचं दुसरं नाव म्हणजे भुलथापा, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची टीका….

हॅलो जनता, प्रतिनिधी (मुक्ताईनगर) एकनाथ खडसे (Eknath khadase) राष्ट्रवादीचा प्रचार करत नसून स्वतःच्या फॅमिलीचा प्रचार करत आहे. एकनाथ खडसेंचं दुसरं नाव म्हणजे भुलथापा, खडसे म्हणजे आता जोक झाला आहे अशी टीका मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
एकनाथ खडसे (Eknath khadase) यांनी मध्यंतरी प्रसार माध्यमांसमोर राज्य सरकारवर टीका करताना सांगितले होते की, या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर जनतेला प्रलोभन देऊन भूलथापा देण्याचे काम केले आहे. लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारला कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसा शिल्लक राहणार नाही असे खडसे यांनी सांगितले होते. यावर आज चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की खडसे हेच मोठे भूलथापा आहे.
एकनाथ खडसे यांचे दुसरे नाव म्हणजे भूलथापा आहे. खडसे म्हणजे काय खडसे जोक झाला आहे. आता खडसे सकाळी कोणत्या पक्षात, दुपारी कोणत्या पक्षात, संध्याकाळी कोणता पक्ष, एकाच घरातले तीन जण एकत्र बसून निर्णय घेतात, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे. खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासाठी काम करत नसून ते स्वतःच्या मुलीसाठी काम करत आहेत. पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात जाऊन सर्व काही त्यांच्या फार्महाऊसवरून सुरू आहे. राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय कुठेही नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. एकंदरीतच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळं मुक्ताईनगरचे वातावरण चांगलंच तापलं आहे.
ब्रेकिंग : एरंडोल पारोळा मतदरसंघातून सतीश पाटील यांची उमेदवारी फायनल….
ब्रेकिंग : भाजप महाराष्ट्रात “इतक्या” जागांवर लढणार, दिल्लीत सर्व काही ठरलं…