जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग क्रमांक ४ मध्ये अश्फाक खाटीक यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा


प्रभागातील “या” समस्यांचा अश्फाक खाटीक यांनी केला पाठपुरावा
प्रभाग क्रमांक चारमधील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतेचे प्रश्न, आरोग्य सेवा तसेच शैक्षणिक सुविधांबाबत नागरिकांमध्ये दीर्घकाळापासून नाराजी होती. या समस्यांवर सातत्याने पाठपुरावा करत अश्फाक खाटीक यांनी वेळोवेळी प्रशासनाशी समन्वय साधून उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला. पाणीटंचाईच्या काळात पर्यायी व्यवस्था, खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी केलेला पाठपुरावा, तसेच स्वच्छता मोहिमा राबवून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असल्याचे नागरिक सांगतात.
सामाजिक कार्याच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना मदत, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, युवकांसाठी क्रीडा स्पर्धा व उपक्रम, तसेच महिलांसाठी विविध प्रशिक्षण व सक्षमीकरण कार्यक्रम राबवण्यात खाटीक यांनी सक्रिय भूमिका घेतली. सार्वजनिक उद्याने, सभामंडप, रस्ते दिवे आणि अन्य नागरी सुविधांच्या सुधारणा यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न मतदारांच्या विशेष लक्षात राहिले आहेत.
जळगाव मनपा निवडणूक : घरोघरी जाऊन प्रचार सुरू..
सध्या प्रचारादरम्यान खाटीक घराघरांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत असून त्यांच्या समस्या ऐकून घेत आहेत. या भेटींमध्ये नागरिकांकडून व्यक्त होणारा विश्वास आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता, या प्रभागात भाजप उमेदवाराला चांगले मताधिक्य मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. “विकास हेच आमचे ध्येय” अशी भूमिका मांडत त्यांनी आगामी काळात प्रभागातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक चारमध्ये निवडणूक वातावरण तापले असून प्रचार फेऱ्या, बैठका, सभा आणि नागरिकांशी थेट संवाद यांमुळे राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. नागरिकांच्या अपेक्षा, उमेदवारांची कामगिरी आणि प्रचारातील प्रभावीपणा यावरच अंतिम निकाल अवलंबून राहणार असल्याचे बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
भडगाव तालुक्यातील राजकारणाचे चाणक्य – युवराज आबा पाटील
ब्रेकिंग : पाचोरा तालुक्यात बिबट्याची दहशत; ऊस तोडणीदरम्यान तीन पिल्ले आढळली..




